मेस्सीने विक्रमी सहाव्यांदा जिंकला बॉलन-डी'ओर पुरस्कार 

वृत्तसंस्था
Tuesday, 3 December 2019

अखेर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सलग तीन वर्षांचा बॉलन-डी'ओरचा दुष्काळ संपवला आहे. त्याने यंदाच्या वर्षाच्या बॉलन-डी'ओर पुरस्कार पटकावित सर्वाधिक सहाव्यांदा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम केला. 

पॅरिस : अखेर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सलग तीन वर्षांचा बॉलन-डी'ओरचा दुष्काळ संपवला आहे. त्याने यंदाच्या वर्षाच्या बॉलन-डी'ओर पुरस्कार पटकावित सर्वाधिक सहाव्यांदा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम केला. 

व्वा मानलं तुला! एकही धाव न देता घेतले सहा बळी

मेस्सीने त्याचा पारंपारिक प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिव्हरपूलचे स्टार व्हर्जिल व्हॅन डायिक आणि सॅडिओ माने यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे. मेस्सी आणि रोन्लाडो यांनी सलग 10 वर्षे या पुरस्कारावर राज्य केले होते. अखेर गेल्या वर्षी 2018मध्ये क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रीचने हा पुरस्कार जिंकत या दोघांची मक्तेदारी संपुष्टात आणली. 

Image

 


​ ​

संबंधित बातम्या