मेस्सी लेट आला तरीही 67 वर्षांचा विक्रम मोडून गेला

सुशांत जाधव
Monday, 20 July 2020

सात वेगवेगळ्या हंगामात सर्वाधिक गोल डागणारा मेस्सी हा एकमेव खेळाडू आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्याला त्याला मुकावे लागले होते.

लिओनेल मेस्सीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर ला लीगाच्या अखेरच्या सामन्यात बार्सिलोनाने अल्वेसवर 5-0 अशा विजयाची नोंद केली. या सामन्यातील गोलसह स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगामध्ये मेस्सीने अनोख्या विक्रमाची नोंद केली. सातव्यांदा त्याने हंगामात सर्वाधिक गोल नोंदवण्याचा पराक्रम करुन दाखवला. या कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा गोल्डन बूटवर कब्जा केला. मेस्सीने लीगमध्ये 25 गोल केले. त्याच्यापाठोपाठ करीम बेंजेमा याचा क्रमांक लागतो. दोघांच्यात सुरुवातीपासून टक्कर पाहायला मिळाली. पण मेस्सीने त्याला चार गोलने पिछाडीवर टाकत सातव्यांदा गोल्डन बूट मिळवला.

धोनीनं खूप ट्रॉफ्या जिंकून दिल्या असल्या तरी... माझं मत दादालाच!

सात वेगवेगळ्या हंगामात सर्वाधिक गोल डागणारा मेस्सी हा एकमेव खेळाडू आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्याला त्याला मुकावे लागले होते. तरीही त्याने अफलातून कामगिरी करुन दाखवत विक्रमला गवसणी घातली. अर्जेंटिनाच्या स्टारने 33 सामन्यात 25 गोल डागले.  स्पॅनिश फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूला पिचिची पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.  

छवि

चलो दुबई...जुळवाजुळव सुरु

हा पुरस्कार सर्वाधिक पटकवण्याचा विक्रम यापूर्वी एथलेटिक बिलबाओच्या महान फुटबॉलपटू टेल्मो जारा यांच्या नावे होता. त्यांनी सहावेळा हा पुरस्कार पटकावला आहे. जारा यांनी 1952-53 मध्ये अखेरचा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर आता 67 वर्षांनंतर त्यांचा विक्रम मागे टाकत मेस्सीने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. एल्वेस विरुद्धच्या सामन्यात मेस्सीने अंसू फातीचा गोल असिस्ट करत आणखी एक विक्रम आपल्या नावे नोंदवला. या हंगामात त्याने 21 गोल असिस्ट केले. हंगामात सर्वाधिक  गोल असिस्ट करण्याचा विक्रम हा बार्सिलोनाचे माजी कर्णधार जावी हर्नांडेज यांच्या नावे होता. त्यांनी 2008-09 च्या हंगामात 20 गोल असिस्ट केले होते. हा विक्रमही मेस्सीने मोडीत काढला.  भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या