चॅम्पियन्स लीग : मेस्सीची निर्णायक कामगिरी, रोनाल्डोकडून निराशा 

वृत्तसंस्था
Wednesday, 17 April 2019

बहारदार ऍजॅक्‍स 
- ऍजॅक्‍स नवव्यांदा चॅम्पियन्स लीगमध्ये उपांत्य फेरीत, मात्र 1996-97 नंतर प्रथमच 
- जर्मनी, इटली, इंग्लंड, स्पेन तसेच फ्रेंच या अव्वल पाच लीगमध्ये नसलेला संघ 2004-05 नंतर प्रथमच उपांत्य फेरीत 
- युव्हेंटिसची प्रथमच युरोपिय स्पर्धेत सलग दोन होम लढतीत हार 
- ऍजॅक्‍सचा सलग तिसऱ्या अवे लढतीत विजय 
- ऍजॅक्‍सचा मथायस डेलाईट (19 वर्षे 246 दिवस) हा स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीतील गोल केलेला दोन दशकातील सर्वात लहान खेळाडू. 

लंडन : लिओनेल मेस्सी दोन बहारदार गोल करून बार्सिलोनाची चॅम्पियन्स लीगमधील भक्कम वाटचाल कायम राखत असताना ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पदरी निराशा आली. केवळ चॅम्पियन्स लीग यशासाठी युव्हेंटिसने रोनाल्डोसाठी जबर किंमत मोजली होती, पण त्याने निराशा केल्याने युव्हेंटिसचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच 2-3 (दुसऱ्या टप्प्यात 1-2) असे आटोपले. 

खरं तर पहिल्या टप्प्यातील लढत बरोबरीत सुटल्याने युव्हेंटिसवर ऍजॅक्‍सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्याच्यावेळी दडपण होते. रोनाल्डोने पूर्वार्धातील कॉर्नरवर हेडर करीत युव्हेंटिसची मोहीम सुरू केली. ऍजॅक्‍सच्या युवा संघाने हार मानली नाही. त्यांनी 67 व्या मिनिटास 2-1 आघाडी घेतली. ऍजॅक्‍सचे दोन अवे गोल झाले होते, त्यामुळे रोनाल्डो आणि त्याच्या सहकाऱ्यांवर दडपण आले. 

युव्हेंटिसच्या सर्व आशा रोनाल्डोवरच होत्या, पण ऍजॅक्‍सने थेट रोनाल्डोची कोंडी केली नसली तरी तो खेळाची सूत्रे पूर्ण राखणार नाही याची खबरदारी घेतली होती. रोनाल्डोपासून चेंडू जास्तीत जास्त दूर ठेवला. त्यामुळे रोनाल्डोला काहीसे वैफल्य आले. त्यामुळे त्याची कामगिरी खालावत गेली. त्याने संयमही गमावला. अंतिम सेकंदात त्याला पिवळ्या कार्डलाही सामोरे जावे लागले आणि 2015 नंतर प्रथमच रोनाल्डो चॅम्पियन्स लीगमध्ये पराभवास सामोरा गेला. त्यावेळी तो रेयाल माद्रिदकडे होता, तर रेयालला हरवणारा संघ युव्हेंटिस होता. यंदा युव्हेंटिसकडून खेळताना रोनाल्डोने रेयाल माद्रिदला हरवले, पण ऍजॅक्‍सच्या युवा संघाने त्याला सांघिक कामगिरीचे महत्त्वच जणू पटवून दिले. 

मेस्सीने घरच्या मैदानावर बहारदार कामगिरी करीत दोन गोल केले आणि बार्सिलोनास मॅंचेस्टर युनायटेडविरुद्ध 4-0 (दुसऱ्या टप्प्यात 3-0) असे विजयी केले. बार्सिलोना बहरात नसताना युनायटेडने संधी दवडली होती. घरच्या मैदानावर मेस्सी आणि त्याचे सहकारी बहरले. मेस्सीने 16 व्या मिनिटास गोल केल्यावर चित्र स्पष्ट झाले. पहिल्या टप्प्यात पिछाडीवरून पीएसजीला हरवल्याने युनायटेड आशावादी होते, पण बार्सिलोनाने त्यांना प्रतिकाराचीही संधी दिली नाही. बार्सिलोनाच्या दर्जाचा खेळ करणे हे आमचे लक्ष्य असेल, अशी कबुली युनायटेडचे व्यवस्थापक ओले गनर यांनी दिली. 

युव्हेंटिसचे समभाग कोसळले 
चॅम्पियन्स लीगमधील पराभवामुळे युव्हेंटिसच्या समभागाची किंमत 22 टक्‍क्‍यांनी कमी झाली. बाजार बंद होताना समभाग काहीसे स्थिरावले, पण तरीही त्याची घसरणच झाली. काही आठवड्यांपूर्वी 1.71 पौंडला गेलेले समभाग 1.24 पर्यंत खाली आले होते आणि अखेर 1.43 वर स्थिरावले. 

बहारदार ऍजॅक्‍स 
- ऍजॅक्‍स नवव्यांदा चॅम्पियन्स लीगमध्ये उपांत्य फेरीत, मात्र 1996-97 नंतर प्रथमच 
- जर्मनी, इटली, इंग्लंड, स्पेन तसेच फ्रेंच या अव्वल पाच लीगमध्ये नसलेला संघ 2004-05 नंतर प्रथमच उपांत्य फेरीत 
- युव्हेंटिसची प्रथमच युरोपिय स्पर्धेत सलग दोन होम लढतीत हार 
- ऍजॅक्‍सचा सलग तिसऱ्या अवे लढतीत विजय 
- ऍजॅक्‍सचा मथायस डेलाईट (19 वर्षे 246 दिवस) हा स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीतील गोल केलेला दोन दशकातील सर्वात लहान खेळाडू. 

युनायटेडची मोठी हार 
- बार्सिलोना 2014-15 नंतर प्रथमच उपांत्य फेरीत 
- मॅंचेस्टर युनायटेड सर्वाधिक सातव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत पराजित 
- युरोपियन स्पर्धा इतिहासातील युनायटेडची 0-4 ही सर्वात मोठी हार. यापूर्वी एसी मिलानविरुद्ध 1957-58 मध्ये 2-5 पराभव 
- 1999 नंतर प्रथमच युनायटेडने सलग चार लढती गमावल्या 
- मेस्सीचा 2013 नंतर प्रथमच चॅम्पियन्स लीग उपांत्यपूर्व लढतीत गोल. या दरम्यानच्या 12 लढतींत तसेच 50 शॉट्‌सनंतरही पाटी कोरी 
- मेस्सीचे या मोसमात सर्वाधिक 45 गोल (युरोपातील पाच अव्वल स्पर्धांतील क्रमवारीतीलही आघाडीवर) 
- मेस्सीचे चॅम्पियन्स लीगमध्ये इंग्लंडमधील संघांविरुद्ध सर्वाधिक 24 गोल. 


​ ​

संबंधित बातम्या