फुटबॉल चाहत्यांसाठी खुशखबर, मेसीसह बार्सिलोना खेळाडूंचा सराव सुरु

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

क्लबकडून ट्विट करत 56 दिवसानंतर बार्सिलोना संघ परत सरावाला सुरुवात करत असल्याची माहिती देण्यात आली.

जगभरात कोरोना व्हायरसचा जगभरात झालेला फैलाव पाहात सगळ्या क्रिडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, क्रीडापटू त्यांच्या घरातत अडकून पडल्याने त्यांच्या सराववर देखील याचा परिणाम होत होता. पण बार्सीलोना फुटबॉल क्लबचा स्टार खेळाडू लियोनेल मेसी याने संघातील इतर खेळाडूंसोबत सरावाला सरावाला सुरुवात केली आहे. स्पेनमध्ये ला लीगा स्पर्धेपासून परत एकदा फुटबॉल खेळण्याची तयारी करण्यात येत आहे. बार्सिलोना क्लबच्या खेळाडूनी गैम्पर ट्रेनिंग सेंटरमध्ये व्यक्तिगत सराव सत्रामध्ये भाग घेतला. याबद्दल क्लबकडून ट्विट करत 56 दिवसानंतर बार्सिलोना संघ परत सरावाला सुरुवात करत असल्याची माहिती देण्यात आली.

 

 

बार्सिलोना संघाचे खेळाडू ड्रेसिंग रुम मध्ये न जाता थेट मैदानावर गेले, प्रत्येकाने सामजिक अंतर ठेवत वयक्तिक सराव केला. सेविला, विलारियाल, ओसासुना आणि लेगानेस या संघानी देखील त्यांच्या सरावाला सुरुवात केली आहे, त्यासोबत रियल माद्रिद सोमवारपासून सरावाला सुरुवात करणार आहे.

याआधी दक्षिण केरियामध्ये फुटबॉल के लीग स्पर्धा खेळण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्रेक्षकाविना रिकाम्या मैदानवर बंद दाराआड खेळवण्यात येत आहे. त्यासोबतच य़ा स्पर्धा प्रेक्षकांना टिव्ही तसेच इंटरनेटच्या माध्यमातून पाहाता येणार आहेत.

 

 

 

 


​ ​

संबंधित बातम्या