रोनाल्डोला मागे टाकत मेस्सीचे चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोल

वृत्तसंस्था
Thursday, 29 November 2018

बार्सिलोनाचा स्टार लिओनल मेस्सीने पीएसव्हीविरुद्ध झालेल्या सामन्यात गोल करत पारंपारिक प्रतिस्पर्धी ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा चॅम्पियन्स लीगमध्ये एकाच क्लबकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला. 

माद्रिद : बार्सिलोनाचा स्टार लिओनेल मेस्सीने पीएसव्हीविरुद्ध झालेल्या सामन्यात गोल करत पारंपारिक प्रतिस्पर्धी ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा चॅम्पियन्स लीगमध्ये एकाच क्लबकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला. 

सध्या सुरु असलेल्या UEFA Champions League स्पर्धेत बार्सिलोनाने पीएसव्ही क्लबवर 2-1 असा विजय मिळवित बाद फेरीत प्रवेश केला. या सामन्यात मेस्सीने बार्सिलोनासाठी 61 व्या मिनिटाला पहिला गोल केला. याच गोलसह त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनाकडून 106 गोल पूर्ण केले. 

रोनाल्डोने रेयाल माद्रिदकडून यापूर्वी 105 गोल केले होते. मात्र यावर्षी त्याचा रेयाल माद्रिदसोबतचा करार रद्द होऊन आणि त्याला युव्हेंटसने करारबद्ध केले. त्यामुळे त्याला आता हा विक्रम मोडण्यासाठी युव्हेंटसकडून मेस्सीपेक्षा जास्त गोल करावे लागणार आहेत. 

चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्याच नावावर आहे. त्याने सर्व क्लब मिळून 121 गोल केले आहेत तर मेस्सीचे आजवर 106 गोल झाले आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या