फार तर मला दोष द्या, पण जोकोविचला काय बोलायचं नाय!

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

बर्नाबिच यांनी पिंक टिव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोरोनाजन्य परिस्थितीत पार पडलेल्या एड्रिया टूर टेनिस स्पर्धेच्या आयोजनावर सुरु असलेल्या चर्चेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की,...

एड्रिया टूर टेनिस स्पर्धेच्या आयोजनामध्ये सहभागी असलेल्या आघाडीचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला सध्या टिकेचा सामना करावा लागत आहे. टेनिस जगतात अव्वल स्थानावर असलेल्या जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी काही दिवसांपूर्वीच झाली. त्याच्यासह अन्य तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनंतर स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सहभागी असलेल्या जोकोविचवरही संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले होते. हेतू चांगला असला तरी स्पर्धेचे नियोजन करुन जोकोविच आणि कंपनीने मोठी चूक केल्याच्या प्रतिक्रिया जगभरातून उमटत आहेत. जोकोविचवर मोठ्या प्रमाणात टिका होत असताना आता सर्बियाच्या पंतप्रधान  एना बर्नाबिच यांनी जोकोविचला पाठिंबा दर्शवला आहे.  

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू माहित आहेत का? 

बर्नाबिच यांनी पिंक टिव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोरोनाजन्य परिस्थितीत पार पडलेल्या एड्रिया टूर टेनिस स्पर्धेच्या आयोजनावर सुरु असलेल्या चर्चेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, जोकोविचचा या स्पर्धेच्या आयोजनाचा हेतू चांगला होता. नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी निधी गोळा करण्याच्या हेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशाची पंतप्रधान या नात्याने जोकोविचला दोषी न धरता माझ्यावर आरोप केले तर चालेल, अशा शब्दांत त्यांनी जोकोविचची पाठराखण केली.  यापूर्वी इंग्लिश  प्रीमियर लीग (ईपीएल) क्लबमधील मॅन्चेस्टर युनाइटेडचा मिडफील्डर आणि सर्बियाचा स्टार फुटबॉलपटून नेमांजा मेटिचने जोकोविचची बाजू घेतली होती. सर्बियामध्ये सर्वकाही सामान्य आहे. भविष्यात कोरोनाची लागण झालेल्या काही व्यक्ती सापडल्या तरी त्यात जोकोविचची चूक आहे, असे म्हणता येणार नाही.

चेंडूला चमकवण्यासाठी आयसीसीने दुसरा पर्याय देणं गरजेचे : भुवी  

सर्बिया आणि क्रोएशियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चॅरिटी टेनिस स्पर्धेत जोकोविचसह अन्य खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. जोकोविचची पत्नी जेलेना, प्रशिक्षक गोरान इवानिसेविकसह ग्रिगोर दिमित्रोव, बोर्नो कोरिच आणि विक्टरसह त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. या लोकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर स्पर्धेदरम्यान झालेल्या गर्दीचे काही व्हिडिओ समोर आले. कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये झालेल्या स्पर्धेत कोणतेही नियम पाळले गेले नाहीत. या मुद्यावरुन स्पर्धेच्या आयोजकांना धारेवर धरण्यात आले. क्रोएशियामध्ये तर चक्क जोकोविचचे पोस्टर लावून त्याचा निषेध नोंदवण्याचा प्रकार घडला होता. 


​ ​

संबंधित बातम्या