कोहलीकडे बघून फलंदाजी शिकलो : फखर झमान

वृत्तसंस्था
Friday, 24 August 2018

त्याच्या फलंदाजी आणि मेहनतीमुळे तो आमच्या सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. मला त्याची फलंदाजी पाहताना फार आनंद मिळतो आणि त्याच्याकडे पाहून मी फलंदाजी शिकलो आहे,'' अशा शब्दात त्याने कोहलीचे कौतुक केले आहे. 

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून पहिले द्विशतक झळकावणारा फलंदाज फखर झमानने भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडमध्ये केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ''विराट हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे यात काहीच शंका नाही. त्याच्या फलंदाजी आणि मेहनतीमुळे तो आमच्या सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. मला त्याची फलंदाजी पाहताना फार आनंद मिळतो आणि त्याच्याकडे पाहून मी फलंदाजी शिकलो आहे,'' अशा शब्दात त्याने कोहलीचे कौतुक केले आहे. 

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कसोटी कारकिर्दीतील 23वे शतक झळकावले. याचसह त्याने जागतिक कसोटी क्रमावारीत पुन्हा पहिले स्थान पटकावले. फखरने कोहलीच्या सातत्याने प्रचंड प्रभावित झाल्याचेही स्पष्ट केले. 

फखरने नुकताच वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिवियन रिचर्ड्स यांचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम मोडला.


​ ​

संबंधित बातम्या