डेव्हिस करंडकातून लिअँडर पेसची हकालपट्टी

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

दुहेरीतील अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेस याला आगामी डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक स्पर्धेतील लढतीसाठी वगळण्यात आले आहे. सर्बियाविरुद्ध सर्बियात 14 ते 16 ऑक्‍टोबरदरम्यान भारताला जागतिक गट पात्रता लढत (प्ले-ऑफ) खेळावी लागेल. 

नवी दिल्ली : दुहेरीतील अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेस याला आगामी डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक स्पर्धेतील लढतीसाठी वगळण्यात आले आहे. सर्बियाविरुद्ध सर्बियात 14 ते 16 ऑक्‍टोबरदरम्यान भारताला जागतिक गट पात्रता लढत (प्ले-ऑफ) खेळावी लागेल. 

पेसने जाकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी अखेरच्या क्षणी संघातून माघार घेतली. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले रोहन बोपण्णा-दिवीज शरण दुहेरीचे आव्हान पेलतील. एकेरीसाठी युकी भांब्री, रामकुमार रामनाथन आणि प्रज्ञेश गुणेश्वरन यांची निवड झाली. 

दुहेरीची लढत डेव्हिस करंडकात महत्त्वाची मानली जाते. या निकालामुळे लढतीचे पारडे फिरू शकते, मात्र जागतिक क्रमवारीत 37व्या क्रमांकावरील बोपण्णा आणि 38व्या क्रमांकावरील दिवीज यांच्या क्षमतेवर निवड समितीने विश्वास दर्शविला. माजी नॉन प्लेइंग कॅप्टन एस. पी. मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील समिती बलराम सिंग, नंदन बाळ, रोहित राजपाल आणि प्रशिक्षक झिशान अली यांचा समावेश आहे. त्यांनी टेलीकॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. महेश भूपती सध्या नॉन प्लेइंग कॅप्टन आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या