ICC WTC Point Table: विंडीजने उघडले खाते; टिम इंडिया टॉपलाच 

सुशांत जाधव
Monday, 13 July 2020

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ 360 गुणांसह अव्वलस्थानी आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यातील कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यात विंडीजने दिमाखदार विजय नोंदवला. तीस वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकण्याच्या दिशेने संघाची पावले पडत आहेत. इंग्लंड विरुद्दच्या पहिल्या कसोटी सामना जिंकत विंडीजने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील आपले खाते उघडले आहे. त्यांच्या नावावर आता 40 गुण जमा झाले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतर्गत वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध पहिली कसोटी मालिका खेळली होती. पण या मालिकेत त्यांना टिम इंडियाने एकहाती पराभूत केले होते. त्यानंतर अखेर विंडीजच्या संघाला खात उघडण्यात यश आले. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ 360 गुणांसह अव्वलस्थानी आहे.

कशाला हवा अंपायर कॉल ? विकेटवर बॉल लागला म्हणजे आऊटच !!

भारतीय संघाने 9 पैकी  7 सामने जिंकले आहेत तर 2 सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे.  ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 10 पैकी 7 सामन्यातील विजयासह 296 गुण मिळवले आहेत. न्यूझीलंडचा संघ 7 पैकी 3 सामन्यातील विजय आणि 4 सामन्यातील पराभवासह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या नावे 180 गुण आहेत. इंग्लंड 146, पाकिस्तान 140 , श्रीलंका 80, वेस्ट इंडीज 40 आणि दक्षिण आफ्रिकेच्या नावे 30 गुण जमा आहेत. बांगलादेशला अद्यापही खाते उघडता आलेले नाही.

 कशी आहे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप प्वॉइंट्स सिस्टम

मालिकेच स्वरुप विजयी संघास मिळाणारे गुण सामना बरोबरीत सुटल्यास मिळणारे गुण सामना अनिर्णित झाल्यास दिले जाणारे गुण
दोन सामन्यांची मालिका  60 30 20
तीन सामन्यांची मालिका  40 20 13
चार सामन्यांची मालिका 30 15 10
पाच सामन्यांची मालिका 24 12 8

कशाला हवा अंपायर कॉल ? विकेटवर बॉल लागला म्हणजे आऊटच !!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप गुणतालिका

संघ     M     W     L T D N/R PT
भारत 9 7 2 0 0 0 360
ऑस्ट्रेलिया 10 7 2 0 1 0 296
न्यूझीलंड 7 3 4 0 0 0 180
इंग्लंड 10 5 4 0 1 0 146
पाकिस्तान 5 2 2 0 1 0 140
श्रीलंका 4 1 2 0 1 0 80
वेस्ट इंडीज 3 1 2 0 0 0 40
दक्षिण अफ्रीका 7 1 6 0 0 0 30
बांगलादेश 3 0 3 0 0 0 0

 

 


​ ​

संबंधित बातम्या