प्रमुख प्रशिक्षक नाही झालो; आता बॅटींग प्रशिक्षकासाठी तयारीला लागतो

वृत्तसंस्था
Tuesday, 20 August 2019

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड करण्यात आली. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असलेले लालचंद राजपूत यांनी आता फलंदाजी प्रशिक्षकासाठी अर्ज केला आहे. 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड करण्यात आली. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असलेले लालचंद राजपूत यांनी आता फलंदाजी प्रशिक्षकासाठी अर्ज केला आहे. 

शास्त्रीबरोबर टॉम मूडी, माईक हेसन, रॉबिन सिंग आणि लालचंद राजपूत यांनीसुद्धा प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. मात्र, त्याला यश मिळाले नाही. आता त्यांनी आपला मोर्चा फलंदाजी प्रशिक्षकपदाकडे वळविला आहे.   

फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी राजपूत यांना माजी कसोटी सलामीवीर विक्रम राठोर याची कडवी टक्कर आहे तर संजय बांगर यांनीही पुन्हा या पदासाठी अर्ज केला आहे. फलंदाज प्रशिक्षकासाठी प्रविण आम्रे, अमोल मुझुमदार आणि सिंतांशू कोटक हेही शर्यतीत आहेत. गुरुवारपर्यंत सर्व मुलाखती पूर्ण होतील आणि त्यानंतर सर्व पदावरील विजयी उमेदवाराची नावे जाहीर केली जातील.


​ ​

संबंधित बातम्या