भारताला विश्वकरंडक जिंकून देणारा झिंबाब्वेचा प्रशिक्षक

वृत्तसंस्था
Saturday, 25 August 2018

भारताचे माजी फलंदाज लालचंद राजपूत यांची झिंबाब्वेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. झिंबाब्वे क्रिकेटने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन ही घोषणा केली. 

नवी दिल्ली : भारताचे माजी फलंदाज लालचंद राजपूत यांची झिंबाब्वेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. झिंबाब्वे क्रिकेटने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन ही घोषणा केली. 

पाकिस्तान, झिंबाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मे महिन्यात झालेल्या तिरंगी मालिकेसाठी आणि पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेसाठी राजपूत यांना झिंबाब्वेचे प्रशिक्षकपदाची तातपुरती जबाबदारी सोपवण्यात आली होती. 

''मी नियुक्तीसंबंधात खूप आनंदी आणि उत्साहित आहे आणि मी आव्हानासाठी तयार आहे. माझ्.चा क्षमतेचे दखल घेतल्याबद्दल आणि माझी प्रशिक्षकपदी तीन वर्षांसाठी नेमणूक केल्याबद्दल मी आभारी आहे,'' असे मत राजपूत यांनी व्यक्त केले.   
राजपूत यांनी भारतासाठी दोन कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच रणजी करंडक स्पर्धेत मुंबईसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

2007मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पहिला ट्वेंटी20 विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते व्यवस्थापक होते. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय मालिकेतही त्यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून काम केले होते.

राजपूत यांची 2016 मध्ये अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती. यावर्षी जूनमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्याचील कसोटी सामन्यादरम्यान ते अफगाणिस्तानचे प्रशिक्षक होते.   
 


​ ​

संबंधित बातम्या