Asian Games 2018 : लक्ष्यने पटकावले शूटींगमधील दुसरे रौप्य पदक

वृत्तसंस्था
Monday, 20 August 2018

आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या नेमबाजांची विजयी घोडदौड कायम राहिली आहे. भारताच्या लक्ष्य शेरॉनने ट्रॅप प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. हे शूटींगमधील भारताचे दुसरे रौप्य पदक आहे.

जकार्ता : आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या नेमबाजांची विजयी घोडदौड कायम राहिली आहे. भारताच्या लक्ष्य शेरॉनने ट्रॅप प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. हे शूटींगमधील भारताचे दुसरे रौप्य पदक आहे. याआधी दीपक कुमारनेही एअर रायफल प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. 

ट्रॅप प्रकारात लक्ष्य आणि मानवजीत सिंग या दोंघांनीही उल्लेखनाय कामगिरी केली. पहिल्या 10 शॉट्सनंतर लक्ष्य आणि मानवजीत सिंग हे दोघेही दुसऱ्या स्थानावर होते. 30व्या फेरीपर्यंत दोघेही पहिल्या तीन क्रमांकामध्ये होते, मात्र त्यांनंतर मानवजीतचे तीन प्रयत्न हुकले आणि तो पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. 

लक्ष्यसमोर चीनी तैपेईच्या यांग कुनपीचे आव्हान होते. लक्ष्यने अखेरच्या 15 प्रयत्नांत केवळ एकदाच चूक केली मात्र तीच त्याला महागात पडली. तैपेईच्या कुनपीने सुवर्णपदक जिंकले.

 

संबंधित बातम्या