संतोष ट्रॉफी : लक्षद्वीपने दादर नगर हवेलीला रोखले

अलताफ कडकाले
Monday, 11 February 2019

संतोष ट्रॉफी 2019 : सोलापूर : संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत आज पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात लक्षद्वीप संघाने दमन दिवला गोलशून्य बरोबरीत रोखले. लक्षद्वीपचा गोलरक्षक मोहम्मद पकथ  सर्वोत्कृष्ट खेळ करून सामन्याचा हिरो ठरला.

येथील सोलापूर जिल्हा फुटबॉल संघटना आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे इंदिरा गांधी स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे.

मुख्य फेरीसाठी अ गटातून गोवा आणि मध्य प्रदेश यांच्यातच चढाओढ असल्याने दमण दीव आणि लक्षद्वीपचा  संघातील निकाल निरुपयोगी होता. तरीही दोन्ही संघांनी उठावदार खेळ करून सामन्यातील चुरस टिकवून ठेवली.विषेशत  पूर्वार्धात दमण दिवणने आक्रमक खेळ करून लक्षद्वीपला हैराण केले.परंतु लक्षद्वीपचा गोलरक्षक मोहम्मद पकथ याने हमखास चार ते पाच गोल होणाऱ्या संधी निष्फळ ठरवून संघाला तारले. दमन दिवचा  21 वर्षाखालील खेळाडू अफझल नुरानीने आघाडी घेण्यासाठी मारलेले फटके गोलखांबा जवळून गेले. खेळाडूंच्या झटापटीत लक्षद्वीपचा अब्दुल शुकर  जखमी झाला. त्याला बदली करण्यात आले.

उत्तरार्धात मात्र लक्षद्वीपने अधिक प्रभावी खेळ करण्यात यश मिळविले. सामन्यावर सर्वाधिक वेळा नियंत्रण ठेवणाऱ्या लक्षद्वीपचा  अब्दुल कासीम, पुनमपुरा, अब्दुल हसीन, मोहम्मद तफरीक, अब्दुल सुकर यांनी समन्वय ठेवत सातत्याने चेंडू दमण-दीव च्या क्षेत्रात ठेवला. या हल्ल्याने भांबावलेल्या दमण-दीवच्या  अंकित सक्सेना,अनस खान, अनसमॅतो सेंटीगो यांनी अवैधपणे चढाया रोखल्याने लक्षद्वीपचाला तीन फ्री किक मिळाल्या. परंतु , दिशाहिन फटक्यामुळे त्याचे गोल मध्ये रूपांतर झाले नाही. परिणामी सामन्याची गोल कोंडी अखेरपर्यंत सुटली नाही.

दरम्यान, आजच्या सामन्याचे उद्घाटन वालचंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, सोशल कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम.ए. दलाल, प्रा. डॉ. सचिन गायकवाड ज्येष्ठ   प्रशिक्षक  झहिरोद्दीन पुणेकर ,शकील पटेल ,अझम शेख यांच्या उपस्थित करण्यात आले.

संबंधित बातम्या