मेस्सी ! 700 वा गोल केलास.. पण उपयोग काय? बार्सिलोनाची पीछेहाटच 

टीम ई-सकाळ
Thursday, 2 July 2020

मेस्सीच्या बार्सिलोनाला ऍटलेटिको माद्रिदविरुद्ध 2-2 बरोबरी स्वीकारावी लागली. 
मेस्सीने पेनल्टी सत्कारणी लावली, पण ऍटलेटिकोने दोन स्पॉट किकवर गोल करीत मेस्सीच्या पराक्रमी कामगिरीस विजयाची झळाळी लाभू दिली नाही.

माद्रिद : लिओनेल मेस्सीने कारकीर्दीतील सातशेवा गोल करण्याचा पराक्रम केला; पण त्यानंतरही बार्सिलोना स्पॅनिश फुटबॉल लीग अर्थात ला लिगा विजेतेपदापासून दूरच जात आहे. मेस्सीच्या बार्सिलोनाला ऍटलेटिको माद्रिदविरुद्ध 2-2 बरोबरी स्वीकारावी लागली. 
मेस्सीने पेनल्टी सत्कारणी लावली, पण ऍटलेटिकोने दोन स्पॉट किकवर गोल करीत मेस्सीच्या पराक्रमी कामगिरीस विजयाची झळाळी लाभू दिली नाही. बार्सिलोनाच्या या बरोबरीमुळे रेयाल माद्रिदला दोन संघातील फरक चार गुणांपर्यंत नेण्याची संधी असेल. या स्पर्धेतील अजून पाच फेऱ्या शिल्लक आहेत. ऍटलेटिको तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी सेविलास दोन गुणांनी मागे टाकले आहे. 

कोरोनानंतरच्या टेनिस स्पर्धेत भारताचा सुमीत नागल विजेता

रेयाल माद्रिदला धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले, तरच बार्सिलोनास संधी असेल. पण रेयाल माद्रिदकडून चुका होतील, यासाठी दडपण आणणेही बार्सिलोनास साधलेले नाही. बार्सिलोनास चार सामन्यातील तिसऱ्या बरोबरीस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे मार्गदर्शक क्विक्‍यू सेतिएन यांचे पद धोक्‍यात आहे. 

मनोहर दूर झाल्याने आयपीएलचा मार्ग सुकर? 

मेस्सीचा गोल धडाका 
- मेस्सीचे 700 गोल, त्यात 582 डाव्या पायाने, 92 उजव्या पायाने, तर 24 हेडरद्वारे 
- मेस्सीचे 24 गोल डायरेक्‍ट फ्री किकवर, तर 90 पेनल्टीवर 
- मेस्सीचे 580 गोल गोलक्षेत्रातून, तर 120 गोलक्षेत्राबाहेरून 
- सातशेपैकी 630 गोल बार्सिलोनाकडून खेळताना, तर 70 अर्जेंटिनाकडून 
- सहाशे ते सातशे हा शंभर गोलचा टप्पा 14 महिन्यांत 
- सातशे गोल करणारा मेस्सी हा सातवा खेळाडू, सर्वाधिक 805 गोल जोसेफ बिकान यांचे. ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे 726 गोल 
- मेस्सीच्या कामगिरीत कमालीचे सातत्य, गेल्या अकरा वर्षात किमान 40 गोल 
- गेल्या दहापैकी नऊ मोसमात मेस्सीचे किमान 50 गोल 
- मेस्सीचे सर्वाधिक 91 गोल 2-12 मध्ये 
- मेस्सी ला लिगामध्ये 40 प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळला, त्यातील झेरेझ, रेयाल मुर्सिया आणि कॅडिझ यांच्याविरुद्ध एकही गोल नाही, सर्वाधिक 37 गोल सेविलाविरुद्ध 

रोनाल्डोचा गोल, युव्हेंटिस प्रभावी 
रोम - युव्हेंटिसने इटालियन लीग अर्थात सिरी ए मध्ये आघाडी राखताना गेनोआचा 3-1 असा पाडाव केला. ख्रिस्तियानो रोनाल्डोनो गोल केल्यामुळे युव्हेंटिसचे पाठीराखे सुखावले आहेत. मात्र संघांने फेब्रुवारीनंतर प्रथमच गोल स्वीकारल्याची त्यांना खंत होती.


​ ​

संबंधित बातम्या