ला लिगा : रिअल मालोर्कावर विजय मिळवत रिअल माद्रिद पुन्हा अग्रस्थानी 

टीम ई-सकाळ
Thursday, 25 June 2020

स्पॅनिश फुटबॉल लीग 'ला लिगा' स्पर्धेत रिअल माद्रिदने रिअल मालोर्का संघावर २ - ० ने विजय मिळवत गुणतालिकेत पुन्हा प्रथम स्थान मिळवेल आहे. त्यामुळे बार्सिलोनाचा संघ पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. मागील काही दिवसांपासून बार्सिलोना आणि रिअल माद्रिद संघांमध्ये  'ला लिगा' स्पर्धेत पहिल्या नंबरवरून चढा-ओढ सुरु आहे.   

अल्फ्रेडो डि स्टेफनो या मैदानावर झालेल्या रिअल माद्रिद आणि रिअल मालोर्का यांच्यातील सामन्यात, रिअल माद्रिदचा संघ विजयी झाल्यामुळे या संघाचे गुण ३१ सामन्यांमध्ये ६८ झाले आहेत. त्यामुळे रिअल माद्रिद संघाचे अंक आणि  बार्सिलोना  संघाचे अंक समान झाले आहेत. मात्र रिअल माद्रिद संघाने केलेले गोल बार्सिलोना पेक्षा अधिक असल्याने रिअल माद्रिदचा संघ शीर्ष स्थानावर पुन्हा विराजमान झाला आहे. 

क्रिकेट_डायरी: विश्वविजेता ठरणे एवढेच नव्हे तर ही अविस्मरणीय घटनाही आजच्याच दिवशी घडली होती..

रिअल माद्रिद आणि रिअल मालोर्का यांच्यातील सामन्यात विनिसियस जूनियर ने १९ व्या मिनिटाला गोल केला. तर सर्जियो रामोसने ५६ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किक वर गोल करत संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. तसेच या लढती दरम्यान, रिअल मालोर्का संघाकडून १५ वर्ष २१९ दिवस वय असलेल्या लुका रोमेरो या खेळाडूने सहभाग नोंदवला. त्यामुळे 'ला लिगा' स्पर्धेत लुका रोमेरो हा सर्वात कमी वयात मैदानावर उतरलेला युवा खेळाडू ठरला.          

​ ​

संबंधित बातम्या