ला लिगा : रिअल माद्रिद-बार्सिलोनामध्ये रस्सीखेच कायम 

टीम ई-सकाळ
Sunday, 12 July 2020

स्पॅनिश फुटबॉल लीग 'ला लिगा' स्पर्धेत अल्वेस आणि रिअल माद्रिद यांच्यात काल शनिवारी झालेल्या सामन्यात रिअल माद्रिद संघाने अल्वेसला नमवत यंदाच्या स्पर्धेतील 24 वा विजय मिळवला आहे.

स्पॅनिश फुटबॉल लीग 'ला लिगा' स्पर्धेत अल्वेस आणि रिअल माद्रिद यांच्यात काल शनिवारी झालेल्या सामन्यात रिअल माद्रिद संघाने अल्वेसला नमवत यंदाच्या स्पर्धेतील २४ वा विजय मिळवला आहे. रिअल माद्रिद संघाने अल्वेस संघावर 2 - 0 ने मात केली. त्यामुळे रिअल माद्रिदचा संघ क्रमवारीत 80 अंकांसह पहिल्या स्थानी कायम आहे. तर रिअल माद्रिद संघाचा प्रतिद्वंदी बार्सिलोना संघ रिअल माद्रिद संघापेक्षा एका अंकाने मागे आहे.        

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे   

अल्वेस आणि रिअल माद्रिद यांच्यात झालेल्या सामन्यात, रिअल माद्रिदच्या करीम बेन्झेमाने खेळाच्या 11 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल नोंदवला. तर त्यानंतर 50 व्या मिनिटाला मार्कोने दुसरा गोल करत, रिअल माद्रिद संघाला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे रिअल माद्रिदने अल्वेसवर विजय मिळवत या हंगामातील आपली विजयी मालिका सुरूच ठेवली असून, माद्रिद 'ला लिगा' स्पर्धेच्या खिताबाजवळ पोहचलेला आहे.      

सॅम्पदोरियाला नमवत सेरी ए फुटबॉलच्या क्रमवारीत अटलांटा तिसऱ्या स्थानी   

दरम्यान, रिअल माद्रिदचा संघ 35 सामन्यांमध्ये 80 गुण मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून, बार्सिलोनाने ३६ सामन्यात 79 गुण मिळवत दुसरे स्थान राखले आहे. तर एटलेटिको माद्रिदचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून, या संघाने 36 सामन्यांमधील 17 सामन्यात विजय मिळवत 66 गुण मिळवले आहेत.

 


​ ​

संबंधित बातम्या