फिफा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नवोदित एम्बापेसह लुका मॉड्रीच शर्यतीत

वृत्तसंस्था
Wednesday, 25 July 2018

फिफाने सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारासाठी मंगळवारी निवडलेल्या दहा खेळाडूंच्या यादीत फ्रान्सच्या जग्गजेत्या फुटबॉल संघातील अँतॉईन ग्रिजमन, रॅफल वॅरेने आणि किलिएन एम्बापे या तिघांचाही समावेश करण्यात आलेला आहे. या यादीत सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांचाही समावेश आहे. 

पॅरिस : फिफाने सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारासाठी मंगळवारी निवडलेल्या दहा खेळाडूंच्या यादीत फ्रान्सच्या जग्गजेत्या फुटबॉल संघातील अँतॉईन ग्रिजमन, रॅफल वॅरेने आणि किलिएन एम्बापे या तिघांचाही समावेश करण्यात आलेला आहे. या यादीत सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांचाही समावेश आहे. 

क्रोएशिया संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवणारा आणि फुटबॉल विश्वकरंडकात 'गोल्डन बॉल' पटकावलेला क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रीच यालाही या यादीत स्थान मिळाले आहे. तसेच फुटबॉल विश्वकरंडकातील 'गोल्डन बूट'चा मानकरी ठरलेला इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन, इजिप्तचा मोहम्मद सलाह आणि बेल्जियमचा एडन हजार्ड आणि केविन डी ब्रुयेन यांचाही या यादीत समावेश आहे. ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारला मात्र या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 

 

एडन हजार्डने मे महिन्यात चेल्सी क्लबकडून खेळताना 'फुटबॉल असोसिएशन चॅलेंज कप' जिंकला होता. तसेच त्याने फुटबॉल विश्वकरंडकात 'सिल्वर बॉल' पटकावला होता.
इजिप्तच्या सलाहने 2017-2018 या वर्षात लिव्हरपूल आणि इजिप्तकडून खेळताना एकूण 46 गोल केले आहेत.      

फिफा सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून मागील दोन वर्षे रोनाल्डोने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. 10 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत पुरस्कारांसाठी मतदान करता येणार आहे. हा पुरस्कार सोहळा 24 सप्टेंबरला लंडनमध्ये पार पडणार आहे. 

यांपैकी एक ठरणार 'बेस्ट'! : 
1. ख्रिस्तियानो रोनाल्डो
2. केविन डी ब्रुयेन
3. अँतॉईन ग्रिजमन
4. एडन हजार्ड
5. हॅरी केन
6. किलिएन एम्बापे
7. लिओनेल मेस्सी
8. लुका मॉड्रीच
9. मोहम्मद सलाह
10. रॅफल वॅरेने


​ ​

संबंधित बातम्या