कुंबळे म्हणतात, कोचलाच कायम दूर व्हावे लागते

संजय घारपुरे
Wednesday, 22 July 2020

संघाचा निरोप घेण्याची वेळ कधी आली हे मार्गदर्शकास ओळखावे लागते. संघापासून दूर कायम मार्गदर्शकासच व्हावे लागते, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी मार्गदर्शक अनिल कुंबळे यांनी केली. 

नवी दिल्ली : संघाचा निरोप घेण्याची वेळ कधी आली हे मार्गदर्शकास ओळखावे लागते. संघापासून दूर कायम मार्गदर्शकासच व्हावे लागते, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी मार्गदर्शक अनिल कुंबळे यांनी केली. 

सेरेनाची 2 वर्षाची मुलगी संघाची मालक

कर्णधार विराट कोहली याच्याबरोबर मतभेद झाल्यामुळे कुंबळे यांना मार्गदर्शकपदावरुन दूर  व्हावे लागले होते. त्यांना मार्गदर्शकपदाच्या कारकीर्दीबाबत समाधानी आहोत. मात्र या कारकीर्दीचा शेवट चांगला झाला असता, तर चांगले झाले असते, असेही त्यांनी सांगितले. मी मार्गदर्शक असताना संघाची कामगिरी चांगली झाली होती. त्या कालावधीत अनेकांनी चांगले योगदान दिले होते. त्या कालावधीबाबत मला कोणतेही दुःख नाही. आता ते सर्व मागे सारुन मी वाटचाल करीत आहे. एक मात्र खरे त्या कारकीर्दीचा शेवट चांगला झाला असता तर नक्कीच आवडले असते. संघाचा निरोप घेण्याची वेळ कधी आली हे मार्गदर्शकास ओळखावे लागते. संघापासून दूर कायम मार्गदर्शकासच व्हावे लागते. त्या एका वर्षात मी मोलाची कामगिरी केली याचा मला खरच आनंद आहे, असेही कुंबळे म्हणाले. 

बीसीसीआयच्या आर्थिक पाठबळामुळेच हरभजन सिंगची 'त्या' प्रकरणातून सुटका  

ते मार्गदर्शक असताना भारताने चॅम्पियन्स करंडक जिंकला होता तसेच सतरापैकी केवळ एक कसोटी गमावली होती. भारतीय संघाचे मार्गदर्शकपद स्वीकारले हा निर्णय योग्यच होता. ते एक वर्ष मी अजूनही विसरलेलो नाही. त्या निमित्ताने पुन्हा भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमचा अनुभव घेता आला असे कुंबळे म्हणाले.


​ ​

संबंधित बातम्या