रोहित-विराट जोडीबद्दल संगकाराने केलं हे मोठं वक्तव्य

टीम ई-सकाळ
Wednesday, 3 June 2020

मैदानात स्थिरावल्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचे खांदे पाडायला या जोडीला वेळ लागत नाही. तसेच भारतीय संघाला कितीही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायची धस्तीही वाटत नाही.

मुंबई :भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा ही जोडी सध्याच्या घडीला क्रिकेट जगतात आघाडीच्या खेळाडूमध्ये गणली जाते. मैदानात स्थिरावल्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचे खांदे पाडायला या जोडीला वेळ लागत नाही. तसेच भारतीय संघाला कितीही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायची धस्तीही वाटत नाही. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकादरम्यान कोहली-शर्मा यांच्यात वाद असल्याची चर्चाही रंगली होती. दोघांमध्ये टोकाचे मतभेद असल्याचे बोलले गेले. पण खेळावर त्याचा कोणताही परिणाम जाणवत नसल्याने सर्वच चर्चा फोल ठरल्या. श्रीलंकेचा माजी कर्णधार संगकारानेही ही जोडी सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे.  

यंदाच्या आयपीएलसाठी धोनी खूपच खास तयारी करत होता : सुरेश रैना 

स्टार स्पोर्ट्सच्या 'क्रिकेट कनेक्टेड शो'मध्ये कुमार संगकाराने विराट-रोहित जोडीवर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला. मॉडर्न क्रिकेटसंदर्भात बोलताना संगकारा म्हणाला की, सध्याच्या घडीला भारतीय संघात विराट कोहील आणि रोहित शर्मा यांच्या रुपात सर्वोत्तम फलंदाज आहेत. मैदानात खेळत असताना दोघांमध्ये कमालीचा उत्साह आणि ऊर्जा दिसून येते. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात ते धोकादायक ठरु शकतात. दोघांच्या भात्यात  तंत्रशुद्ध फटकेबाजीची झलक पाहायला मिळते. त्यामुळेच त्यांना यश मिळत आहे.  

'सुन्या सुन्या मैफली'त रंग भरण्यास भारतीय क्रिकेट सज्ज; पण...

क्रिकेटच्या मैदानात विराट भारी की कोहली भारी अशी चर्चा अनेकदा रंगताना दिसते. कोहलीकडे कर्णधारपद देण्याऐवजी ही जबाबदारी रोहित शर्माने चांगल्या पद्धतीने हाताळली असती, असेही काहींचे म्हणने आहे. मात्र संगकाराला दोन्ही क्रिकेट समतुल्य वाटतात. दोघांच्यातील क्षमताही प्रभावित करणारी असून ही जोडी समानरित्या सन्मानाची हक्कदार आहे, असे संगकाराने म्हटले आहे.  

या कारणामुळे स्मिथने दोन महिन्यापासून बॅटला हातही लावला नाही

विराट कोहली प्रत्येक सामन्यात एक नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. क्रिकेटच्या मैदानात अशक्यप्राय विक्रम नोंदवणाऱ्या सचिनच्या शतकांच्या शतकाचा विक्रम मागे टाकण्याच्या दिशेने कोहली वेगाने पावले टाकत आहे. दुसरीकडे रोहित शर्मा सलामीवीराच्या रुपात नवे-नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. रोहित शर्माने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत विक्रमी 5 शतके ठोकली होती. 
 


​ ​

संबंधित बातम्या