कुलदीप शिखरला म्हणाला की, पाजी चार महिन्यांचा बदला एकदम घेईन!

टीम ई-सकाळ
Friday, 26 June 2020

भारतीय संघातील फिरकीपटू कुलदीप यादव याने सलामीवर शिखर धवनसोबतचा एक जूना फोटो शेअर केलाय. धर्मशाला मैदानातील फोटो शेअर करताना कुलदीपने खेळ आणि सहकाऱ्यासोबतच्या आनंदी क्षणाला मुकल्याची भावना व्यक्त केली आहे.

मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितीमुळे क्रिडा क्षेत्रात मागील तीन महिन्यांपासून शांतता आहे. लॉकडाउनमुळे घरात लॉ झालेले क्रिकेटर्स या परिस्थितीतही आपल्या चाहत्यांचे हटके अंदाजात मनोरंजन करताना पाहायला मिळाले. भारतीय संघातील अनेक क्रिकेटर्संनी यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न केला. मोठ्या ब्रेकनंतर आता खेळाडू सरावासाठी मैदानात उतरण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा मैदानात उतरुन जादू दाखवण्यासाठी उत्सुकता कुलदीपने इन्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे. 

#क्रिकेट_डायरी : या पाच भारतीय फलंदाजांनी पहिल्या ODI शतकासाठी खूप वेळ घेतला!

भारतीय संघातील फिरकीपटू कुलदीप यादव याने सलामीवर शिखर धवनसोबतचा एक जूना फोटो शेअर केलाय. धर्मशाला मैदानातील फोटो शेअर करताना कुलदीपने खेळ आणि सहकाऱ्यासोबतच्या आनंदी क्षणाला मुकल्याची भावना व्यक्त केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय की, लॉकडाउनच्या काळात खेळ आणि सहकाऱ्यांना मिस करतोय. कुलदीपने शेअर केलेल्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रिकेट चाहत्यांसोबत शिखर धवनने देखील यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलंय की, याठिकाणी तू मला त्रास देत नाहीस याबद्दल देवाचे खूप खूप आभार! असं कमेंट धवनने केले आहे. यावर कुलदीपने चार महिन्यांचा एकदम बदला घेईन, असे म्हटलंय.

आयपीएलवरुन बीसीसीआय-पीसीबी आमने सामने

कुलदीप-धवन यांच्यात मैदानात चांगली मैत्री आहे. मैदानात आणि मैदानाबाहेरही दोघे एकमेंकासोबत गंमतीशीर गोष्टी  शेअर करत असतात. ही जोड आयपीएलमध्ये आपली-आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज असताना कोरोना विषाणूच्या संकटामुळे स्पर्धा स्थगित झाली. स्पर्धा होणार की नाही याबाबत अद्यापही संभ्रम आहे. ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकासंदर्भातील निर्णयावर आयपीएलचं समिकरण अवलंबून आहे.  


​ ​

संबंधित बातम्या