कुलदीप यादवसह 'या' खेळाडूची हकालपट्टी; महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन

वृत्तसंस्था
Saturday, 28 December 2019

सध्या सुरु असेलेल्या सीके नायडू करंडकातील दिल्ली आणि बंगाल यांच्यातील सामन्याच्या पूर्वसंधेला हा प्रकार घडला. ख्रिसमस पार्टीत या दोघांनीही महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने त्याच्यावर कठोर कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली आहे. 

कोलकता : ख्रिसमस पार्टीच्यावेळी महिलेशी गैरवर्तन केल्यामुळे 23 वर्षांखालील दिल्ली संघाच्या दोन खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आली आहे. कुलदीप यादव आणि लक्षय थरेजा अशी या दोन खेळाडूंची नावं आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सुरु असेलेल्या सीके नायडू करंडकातील दिल्ली आणि बंगाल यांच्यातील सामन्याच्या पूर्वसंधेला हा प्रकार घडला. ख्रिसमस पार्टीत या दोघांनीही महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने त्याच्यावर कठोर कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली आहे. 

दिल्ली क्रिकेटमध्ये कुलदीप आणि लक्षय खूप प्रसिद्ध आहेत. या दोघांनीही पार्टीनंतर काही महिलांचा पाठलाग ककेला आणि त्यानंतर त्यांच्या रुमबाहेर जाऊन त्यांचे दार वाजवून त्यांना त्रास दिला. या महिलांनी हॉटेलच्या प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर दिल्ली संघटनेने त्यांच्यावर कारवाई केली. 

संघातून बाहेर जायच्या भीतीने त्याने लपवली दुखापत 

''आजपासून सुरु होणाऱ्या बंगालविरुद्धच्या सामन्यात हे दोघे खेळणार नाहीत. सीसीटीव्हीमध्ये त्यांची ओळख पटली आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले आहे,'' असे डीडीसीएच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

​ ​

संबंधित बातम्या