कृणाल पंड्याचे लक्ष्य 2019 चा विश्वकरंडक

वृत्तसंस्था
Saturday, 25 August 2018

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या याने पुढील वर्षी होणाऱ्या क्रिकेट विश्वकरंडकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या याने पुढील वर्षी होणाऱ्या क्रिकेट विश्वकरंडकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. 

कृणालने मुंबई इंडियन्सकडून खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली आहे. 2016पासून मुंबईच्या संघात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, ''पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वकरंडकात भारतासाठी खेळणे हे माझे एकमेव लक्ष्य आहे.'' 

हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ असेलेल्या कृणालला नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. मात्र त्याला अंतिम संघात खेळवण्यात आले नाही. तो म्हणाला, ''मी प्रत्येक सामन्यागणिक प्रगती करत आहे. मी सातत्यपूर्ण कामगिरी केली तर माझे ध्येय साध्य होईल. विश्वकरंडक खेळणे हे माझे मुख्य ध्येय आहे.''      


​ ​

संबंधित बातम्या