Schoolympics 2019 : स्केटिंग स्पर्धेत निहिरा यादवला दुहेरी मुकुट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

बारा वर्षांखालील मुलींच्या स्केटिंग स्पर्धेत निहिरा यादवने दुहेरी मुकुट पटकाविला. कनिष्का देसाईने सुवर्णपदक मिळविले.

कोल्हापूर : बारा वर्षांखालील मुलींच्या स्केटिंग स्पर्धेत निहिरा यादवने दुहेरी मुकुट पटकाविला. कनिष्का देसाईने सुवर्णपदक मिळविले. चौदा वर्षांखालील मुलींत राजनंदिनी कोरेने दोन सुवर्णपदके पटकावली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स स्केटिंग स्पर्धा न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या रिंगवर झाली. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. 

निकाल अनुक्रमे असा :

१२ वर्षांखालील मुली -

क्वॅड - ५०० मीटर -निहिरा यादव (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल), सिद्धवी माने (संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल), सायली गायकवाड (आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल). १००० मीटर - निहिरा यादव, सिद्धवी माने, सायली गायकवाड. इनलाईन - ५०० मीटर - कनिष्का देसाई (ॲड. पी. आर. मुंडरगी प्रायमरी इंग्लिश स्कूल), ओमकारेश्‍वरी जाधव (सेंट झेवियर्स हायस्कूल). 

१४ वर्षांखालील मुले -

इनलाईन - ५०० मीटर - राजनंदिनी कोरे (पोदार इंटरनॅशनल स्कूल), प्राजक्ता सूर्यवंशी (वसंतराव देशमुख हायस्कूल), प्राची जाधव (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई). क्वॅड - १००० मीटर - राजनंदिनी कोरे, प्राची जाधव, प्राजक्ता सूर्यवंशी. राजनंदिनीला दोन, तर कनिष्काला सुवर्णपदक 


​ ​

संबंधित बातम्या