Schoolympics 2019 : मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उषाराजे हायस्कूल प्रथम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 December 2019

मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा (एसएससी) २-० ने पराभव करत विजेतेपद पटकाविले.

कोल्हापूर  : मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा (एसएससी) २-० ने पराभव करत विजेतेपद पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा पोलो मैदानावर सुरू आहे.

उषाराजे हायस्कूल विरुद्ध शाहू विद्यालय यांच्यातील सामन्यात उषाराजे हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. त्यांच्या सानिका पाटीलने ७ , तर समृद्धी कटकोळेने ३४ व्या मिनिटाला गोल करत संघास सामना जिंकून दिला. तृतीय क्रमांकाच्या लढतीत देवाळे विद्यालयाने पोतदार इंटरनॅशनल स्कूलवर २-० ने मात केली. त्यांच्या पायल चिलेने २९ व सानिका पाटीलने ३४ व्या मिनिटाला गोल केला.

 उषाराजे हायस्कूलचा विजेता संघ असा :

राजनंदिनी भोईटे , गौरी चव्हाण , शाल्मली चव्हाण , वैष्णवी डोंबाळे , शर्वरी डोणकर , शीतल गाडीवडर , हर्षदा काटे, समृद्धी कटकोळे , आर्या मोरे , रेवती मुसळे , दिव्या पाचंगे, सई पाटील , सानिका पाटील , शिवानी पाटील , वेदिका संकपाळ , स्वरांजली सावंत , वैष्णवी शिंदे , स्नेहल सुतार.

 


​ ​

संबंधित बातम्या