Schoolympics 2019 : फुटबॉल स्पर्धेत स्वयंम साळोखेचा पंचकार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 December 2019

मुलांच्या फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीत छत्रपती शाहू (सीबीएसई), डी. सी. नरके विद्यानिकेतन, संजय घोडावत, प्रायव्हेट हायस्कूलने प्रतिस्पर्ध्यांना आज पराभूत केले.

कोल्हापूर : मुलांच्या फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीत छत्रपती शाहू (सीबीएसई), डी. सी. नरके विद्यानिकेतन, संजय घोडावत, प्रायव्हेट हायस्कूलने प्रतिस्पर्ध्यांना आज पराभूत केले. प्रायव्हेटच्या स्वयंम साळोखेने हॅट्ट्रिकसह पाच गोल करत आजचा दिवस गाजविला.

महाराष्ट्र हायस्कूल विरुद्ध व्ही. डी. शिंदे हायस्कूल , संजीवन पब्लिक स्कूल विरुद्ध जागृती हायस्कूल यांच्यातील सामना १-१ ने बरोबरीत राहिला . मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.

 छत्रपती शाहू विद्यालयाने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलवर १-० ने मात केली. डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजने महावीर इंग्लिश स्कूलला १-० ने हरविले.

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने (सीबीएसई) छत्रपती शाहू विद्यालयाला (एसएससी) २-० ने पराभूत केले. रोहित जाधव व अमनुल्ला मणियारने प्रत्येकी एक गोल केला. प्रायव्हेट हायस्कूलने ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमीज हायस्कूलचा ५-० ने धुव्वा उडवला. त्यांच्या स्वयंम साळोखेने हॅट्ट्रिकसह पाच गोले केले.

महाराष्ट्र विरुद्ध व्ही. डी. शिंदे हायस्कूल यांच्यातील सामना १-१ ने बरोबरीत राहिला. संजीवन विरुद्ध जागृती हायस्कूलमधील सामन्यात संजीवनकडून सार्थक तावरे, तर जागृतीकडून गोपी बनगे ने गोल केला.


​ ​

संबंधित बातम्या