Schoolympics 2019 : मुलांच्या धनुर्विद्या स्पर्धेत आदित्य, ध्रुवचा डबल धमाका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 December 2019

मुलांच्या धनुर्विद्या स्पर्धेत बारा वर्षांखालील गटात अभिजित पाटील, चौदा वर्षांखालील ध्रुव देसाई, तर सोळा वर्षांखालील गटात आदित्य जाधवने प्रत्येकी दोन सुवर्णपदके पटकाविली.

कोल्हापूर  : मुलांच्या धनुर्विद्या स्पर्धेत बारा वर्षांखालील गटात अभिजित पाटील, चौदा वर्षांखालील ध्रुव देसाई, तर सोळा वर्षांखालील गटात आदित्य जाधवने प्रत्येकी दोन सुवर्णपदके पटकाविली. चौदा वर्षांखालील गटात यशराज परीट, पार्थ महाजन व सोळा वर्षांखालील गटात आदित्य कोडूलकर, मान्सून पाटीलने सुवर्णपदक मिळविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहेत. मिणचे येथील एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतनच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

निकाल अनुक्रमे असा :

१२ वर्षांखालील - इंडियन बो २० मीटर - अभिजित पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) , भार्गव चरणकर (महावीर इंग्लिश स्कूल) , सूरज पाटील (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन) ,  इंडियन बो ३० मीटर - अभिजित पाटील, स्वरूप माने (दानोळी हायस्कूल) , सूरज पाटील. 

१४ वर्षांखालील - इंडियन बो २० मीटर -  यशराज परीट (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन) , पार्थ महाजन (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन) , अथर्व एडके (दानोळी हायस्कूल) .

इंडियन बो ३० मीटर -  पार्थ महाजन , ओमकार सूर्यवंशी (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन) , यश पट्टणकुडे (ग्रीनव्हॅली पब्लिक स्कूल).

रिकर्व्ह बो ३० मीटर - ध्रुव देसाई (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) , श्रीदीप पाटील (ग्रीनव्हॅली पब्लिक स्कूल) , प्रतीक दाभाडे (ग्रीनव्हॅली पब्लिक स्कूल) .

रिकर्व्ह बो ४० मीटर - धुव्र देसाई.

कंपाउंड बो ५० मीटर - युवराज मोरे  (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन) . 

१६ वर्षांखालील - इंडियन बो ३० मीटर -  आदित्य जाधव (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन) , राहुल वसेकर (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन) , सार्थक कामटे (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन) .

इंडियन बो ४० मीटर -  अदित्य जाधव, दर्शन पाटील (ग्रीनव्हॅली पब्लिक स्कूल), राहुल वसेकर.

 रिकर्व्ह बो ३० मीटर - अदित्य कोडूलकर (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन) , प्रणव माळवेकर  (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन) , पार्श्‍व हेरवाडे  (एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन) .

रिकर्व्ह बो ५० मीटर - मान्सून पाटील (महावीर इंग्लिश स्कूल), प्रणव मालवेकर , आदित्य कोडूलकर.


​ ​

संबंधित बातम्या