Schoolympics 2019 : मुलींच्या धनुर्विद्या स्पर्धेत साक्षी, प्रेरणाचा सुवर्णवेध

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 December 2019

मुलींच्या धनुर्विद्या स्पर्धेत सोळा वर्षांखालील गटात साक्षी एडकेने तीन, तर चौदा वर्षांखालील गटात प्रेरणा भोगावेने दोन सुवर्णपदके पटकावली.

कोल्हापूर : मुलींच्या धनुर्विद्या स्पर्धेत सोळा वर्षांखालील गटात साक्षी एडकेने तीन, तर चौदा वर्षांखालील गटात प्रेरणा भोगावेने दोन सुवर्णपदके पटकावली. बारा वर्षांखालील गटात अदिती साळोखे, समृद्धी जगताप, चौदा वर्षांखालील अनुष्का गायकवाड व सोळा वर्षांखालील गटात वैष्णवी देसाई हिने आपापल्या प्रकारांत सुवर्णपदक मिळवले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा मिणचे येथील एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतनच्या मैदानावर सुरू आहे. 

निकाल असा :

१२ वर्षांखालील - इंडियन बो २० मीटर - अदिती साळोखे (विद्यामंदिर) , शिवदत्ता (पाटील (आदर्श गुरुकुल) .

इंडियन बो ३० मीटर - समृद्धी जगताप (कळंबा गर्ल्स हायस्कूल) , अदिती साळोखे (विद्यामंदिर) .

१४ वर्षांखालील - इंडियन बो २० मीटर - प्रेरणा भोगावे, सानिका मगदूम, श्रावणी मोरे (तिघी दानोळी हायस्कूल) .

इंडियन बो ३० मीटर - प्रेरणा भोगावे, श्रावणी मोरे, सानिका मगदूम.

१६ वर्षांखालील - इंडियन बो ३० मीटर - साक्षी एडके, गायत्री दळवी (दोघी दानोळी हायस्कूल) , सुतेजा शेळके (महाराष्ट्र हायस्कूल).

इंडियन बो ४० मीटर - साक्षी एडके, गायत्री दळवी.

रिकर्व्ह बो ३० मीटर - वैष्णवी देसाई (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) , साक्षी एडके, दीक्षा पाटील (ग्रीनव्हॅली पब्लिक स्कूल)


​ ​

संबंधित बातम्या