राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत कोल्हापूरची बाजी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

ही स्पर्धा 19 वर्षाखालील गटाची असून उपांत्य फेरीत काेल्हापूरच्या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळविले आहेत.

सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि के.एस.डी.शानभाग विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शानभाग विद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय हॉकी स्पर्धेत मुलांच्या आणि मुलींच्या गटात यजमान कोल्हापूर विभागाने अंतिम फेरीत प्रवेश नोंदविला आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
ही स्पर्धा 19 वर्षाखालील गटाची असून उपांत्य फेरीतील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या औरंगाबदच्या साई पब्लीक स्कूल आणि कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स.म.लोहिया ज्युनिअर कॉलेज यांच्यातील सामन्यात स.म.लोहिया संघाने साईचा 01- 00 असा पराभव केला.

हेही वाचा -  खेळाडूंनाे नवाेदितांपूढे आदर्श ठेवा : संजय भागवत

दूसऱ्या उपांत्य फेरीच्या पुण्याच्या क्रीडाप्रबोधिनीने दिनानाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा 04-01 असा पराभव केला. क्रीडाप्रबोधिनीच्या गोपाळ मोरे, गौरव दोंदली, धैर्यशिल जाधव यांनी उत्तम खेळ केला.

मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने अमरावती विभागाचा 04-00 असा दणदणीत पराभव केला. कोल्हापूरच्या स्मृती पाटील, प्रतिक्षा मोरे, पूनम पाटील, सनिया अंजनी यांनी उत्तम खेळ केला.

नागपूर विभाग विरुद्ध क्रीडाप्रबोधिनी यांच्यातील लढतीत क्रीडा प्रबोधिनीने 02-00 असा विजय मिळविला. या सामन्यात क्रीडा प्रबोधिनीच्या काजल आटपाटकर, वैशाली लांजेवार यांनी उत्तम खेळ केला.

 

 

 


​ ​

संबंधित बातम्या