आता देशात पाचच स्टेडियमवर कसोटी सामने खेळवा : विराट

वृत्तसंस्था
Tuesday, 22 October 2019

भारतात आता पाचच कसोटी सेंटर असावेत. त्यामुळे भारत दौऱ्यावर येणाऱ्या संघांनाही खेळपट्टी, हवामान आणि येणाऱ्या चाहत्यांचा आधीच अंदाज येईल. भारतात सर्वच स्टेडियमवर आता कसोटी सामने घेतले जाऊ नये.

रांची : भारतीय संघाने रांचीतील तिसरा आणि अखेरचा सामना जिंकत इतिहास रचला. सलग 11 मालिका जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाने केला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने खूप मोठे आणि महत्त्वाचे वक्तव्य केले. देशात आता केवळ पाचच कसोटी सेंटर असावेत असे मत त्याने यावेळी व्यक्त केले. 

 भाड मे गया पिच! आम्हाला 20 विकेट्स हव्यात

Image

भारतीय संघाने रांचीतील कसोटी सामन्यात विजय मिळवित इतिहास रचला तरी या विजयाने विराट कोहली काही फारसा खूश नाही. का? तर हा सामना पाहायला चाहत्यांची उपस्थिती फारच कमी होती. म्हणूनच देशात आता फक्त पाचच स्टेडियमवर कसोटी सामने घेतले जावेत जेणेकरुन जास्त चाहते कसोटी क्रिकेट पाहण्यास येतील आणि कसोटी क्रिकेटही प्रसिद्ध होईल असे कोहलीला वाटते. 

कोहलीच्या सल्ल्याशी तुम्ही सहमत आता का? नोंदवा तुमचे मत

''माझ्यामते भारतात आता पाचच कसोटी सेंटर असावेत. त्यामुळे भारत दौऱ्यावर येणाऱ्या संघांनाही खेळपट्टी, हवामान आणि येणाऱ्या चाहत्यांचा आधीच अंदाज येईल. भारतात सर्वच स्टेडियमवर आता कसोटी सामने घेतले जाऊ नये,'' असा सल्ला त्याने दिला. 

Image

पुढे तो म्हणाला,''मला हे मान्य आहे की, प्रत्येक राज्यात खेळ होणे महत्वाचे आहे. मात्र, हे सगळे ट्वेंटी20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये करता येऊ शकते. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी जेव्हा एखादा संघ भारतात येईल तेव्हा त्याला माहित असायला हवे की आपण या पाच स्टेडियमवर खेळणार आहोत.'' 

कोहली घेणार ब्रेक; हे तीन खेळाडू करु शकतात ट्वेंटी20मध्ये एण्ट्री

कसोटी मालिकेतील तीनही सामन्यांना प्रेक्षकांनी म्हणावी अशी उपस्थिती दाखवली नाही. विशाखापट्टणम, पुणे आणि रांची येथे अर्धे स्टेडियम रिकामेच होते. भारतीय संध घरच्या मैदानावर इतिहास रचत असतानाही प्रेक्षक मोठ्या संख्येने या क्षणाचे साक्षीदार होण्यास उपस्थित राहिले नाहीत. झारखंड स्टेट असोसिएशन स्टेडियमची क्षमता 39 हजार असूनही केवळ 1500 तिकीटं विकली गेली होती आणि म्हणूनच कोहलीने यापुझे भारताता केवळ पाचच स्टेडियमवर कसोटी सामने घेण्याचा उपाय सुचवला.


​ ​

संबंधित बातम्या