कोरोनापासून बचावासाठी विराट-अनुष्काचा खास संदेश 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. मोदींच्या या निर्णयाचे समर्थ सर्व स्तरातून केले जात आहे. क्रिडाविश्वातील दिग्गज खेळाडूनी या निर्णयाचे समर्थन केले आहे

कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. मोदींच्या या निर्णयाचे समर्थ सर्व स्तरातून केले जात आहे. क्रिडाविश्वातील दिग्गज खेळाडूनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा देखील नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहे. त्याने पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

पठाण बंधूंची कोरोना ग्रस्तांना मोठी मदत, दान केले 4000 मास्क

पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का सुरुवात करते की, ‘कोरोना व्हायरस विरोधातील युध्द जींकण्यासाठी वेळ व धाडसाची आवश्यकता आहे’, त्यवर विराट म्हणतो ‘पुढचे 21 दिवस संयम आणि जबाबदारी दाखवण्याची गरज आहे, एखाद्या व्यक्तीचे बेजबाबदारपणाची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागू शकते.’ नंतर दोघे म्हणतात ‘आपण सगळे एकत्र येऊन स्वत:चे आणि देशाचे रक्षण करुया’

विराट आणि अनुष्का यांनी नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याची अपिल केली आहे. कोरोना व्हायरसला हरवण्याचे काम हे अफावांवर विश्वास ठेऊन किंवा मोर्चे काढून गोंधळ घातल्याणे होणार नाही, त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन सांगीतलेल्य गोष्टींचे पालन करावे लागेल. घरातून बाहेर पडणे टाळावे लागेल असे सांगीतले. 

पुनियाने कोरोना विरोधात थोपटले दंड; देणार सहा महिन्याचे पगार

विराट कोहलीने मंगळवारी देखील ट्विट करुन लोकांना घराबाहेर पडू नये असे अवाहन केले होते. त्याने सांगीतले होते की, नरेद्र मोदींनी 21 दिवस देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर मी सगळ्याना विनंती करतो की सगळ्यांनी घरात थांबावे. कोरोनावर सोशल डिस्टींग हा एकच इलाज आहे. विराट सोबतच सचिनने देखील पंतप्रधानांच्या निर्णयाचे समर्थन केले होते. 
 


​ ​

संबंधित बातम्या