ENG vs WI : जाणून घ्या ऐतिहासिक सामन्यात झालेले नवे रेकॉर्डस् 

टीम ई-सकाळ
Monday, 13 July 2020

कोरोनाच्या संकटातून सावरत इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर, साउथहॅम्प्टनच्या मैदानात यजमान इंग्लंड संघाला नमवत पाहुण्या विंडीज संघाने विजय मिळवला.

कोरोनाच्या संकटातून सावरत इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर, साउथहॅम्प्टनच्या मैदानात यजमान इंग्लंड संघाला नमवत पाहुण्या विंडीज संघाने विजय मिळवला. यामुळे वेस्ट इंडिज संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत 1 - 0 ने आघाडी मिळवली आहे. सामन्यातील पाचव्या दिवशीच्या खेळादरम्यान इंग्लंड संघाला  313 धावांवर रोखत, वेस्ट इंडिज संघाने 200 धावांचे लक्ष्य ब्लॅकवुडने केलेल्या 95 धावांच्या जोरावर पार केले. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाच्या शॅनन गॅब्रिएलने धारदार गोलंदाजी करत 9 विकेट मिळवले. या सामन्यात आणखीन काही नवे रेकॉर्ड झाले आहेत. 

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे   

कोरोनानंतरच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा नवा कर्णधार बेन स्टोक्सने वेस्ट इंडिजच्या अल्झारी जोसेफला बाद केल्यानंतर कसोटी कारकिर्दीत आपले 150 बळी पूर्ण केले. व यासोबतच 4,000 कसोटी धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा 4,000 कसोटी धावा आणि 150 विकेट्स घेऊन दुहेरी रेकॉर्ड करणारा दुसरा वेगवान खेळाडू ठरला आहे. यापूर्वी गैरी सोबर्स यांनी या प्रकारचा रेकॉर्ड केला होता. 

यानंतर वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डरने गोलंदाजी करत विरोधी संघाच्या कर्णधाराला 15 वेळा बाद केले. त्यामुळे जेसन होल्डरने पाकिस्तानच्या  इम्रान खानबरोबर संयुक्तपणे असे काम करणारा दुसर्‍या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये त्याने सर्वात जास्त वेळा विरोधी संघाच्या  कर्णधाराला बाद केले आहे. तसेच या सामन्यात कर्णधार म्हणून जेसन होल्डरने पहिल्या डावात सहा किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. व हा विक्रम होल्डरने कसोटी सामन्यात सातव्यांदा केला असून, कर्टनी वॉल्श (7) च्या विक्रमाची बरोबरी केली.    

ला लिगा : रिअल माद्रिद-बार्सिलोनामध्ये रस्सीखेच कायम 

या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 204 धावांवर सर्व बाद झाला . 2019 पासून खेळलेल्या कसोटी सामन्यांपैकी 10 सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 210 पेक्षा कमी धावसंख्या केली आहे. त्यामुळे कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या डावात 210 हा आकडा इंग्लंड संघाला पार करणे जिकिरीचे झाले आहे. यापूर्वी बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी सात वेळेस 210 पेक्षा कमी धावसंख्या केली आहे.

इंग्लंड-विंडीज यांच्यात झालेल्या या कसोटी सामन्यात रोरी बर्न्सने सलामीवीर म्हणून 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. यापूर्वी इंग्लंडच्या अ‍ॅलिस्टर कुकने 2007 मध्ये  सलामीवीर म्हणून 1000 धावांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे 2007 नंतर इंग्लंडचा सलामीवीर म्हणून 1000 धावांचा टप्पा पार करणारा रोरी बर्न्स हा पहिला खेळाडू ठरलेला आहे. शिवाय कसोटीत एक हजार धावा करणारा तो इंग्लंडचा 28 वा सलामीवीर ठरला आहे.      

ENG vs WI : ऐतिहासिक सामन्यात विंडीजचा इंग्लंडवर विजय  

तसेच या सामन्याच्या दुसऱ्या डावात 200 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाच्या ब्लॅकवुडने 95 धावांची खेळी केली. मात्र शतक करण्यापूर्वीच ब्लॅकवुड बाद झाल्यामुळे नर्वस नाइंटीजमध्ये आउट होणारा चौथा कॅरिबियन फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1969 मध्ये बासिल बुचर (91) सामन्याच्या चौथ्या डावात नर्वस नाइंटीजचे शिकार ठरले होते. तर शेरविन कॅम्पबेल (93) व क्रेग ब्रेथवेट (95) हे देखील नर्वस नाइंटीज मध्ये बाद झाले होते.      
                  


​ ​

संबंधित बातम्या