वर्णभेदाच्या मुद्यावर केएल राहुलने शेअर केली भावनिक पोस्ट

टीम ई-सकाळ
Wednesday, 3 June 2020

वर्णभेदाच्या मुद्यावरुन आता 'ब्लॅक लाइव्स मॅटर' अभियान सुरु करण्यात आले असून या माध्यमातून अनेक लोकप्रिय व्यक्तींकडून अशा प्रकारच्या घटना निंदणीय असल्याच्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळते.

मुंबई : अमेरिकेतील आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूवर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अमेरिकन पोलिसांच्या कृत्यानंतर पुन्हा एकदा वर्णभेदाचा मुद्या चव्हाट्यावर आलाय. अमेरिकेत या प्रकरणावरुन आंदोलने सुरु असताना जगभरातील अनेक देशातील लोक भेदभावाच्या मुद्यावर एकत्र आवज उठवत आहेत. वर्णभेदाच्या मुद्यावरुन आता 'ब्लॅक लाइव्स मॅटर' अभियान सुरु करण्यात आले असून या माध्यमातून अनेक लोकप्रिय व्यक्तींकडून अशा प्रकारच्या घटना निंदणीय असल्याच्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळते. भारतीय क्रिकेटर केएल राहुलने देखील वर्णभेदाच्या मुद्यावरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. खेळाच्या मैदानात रंग नव्हे तर क्षमता महत्त्वाची असते, असा उल्लेखही त्याने आपल्या पोस्टमध्ये केलाय.

यंदाच्या आयपीएलसाठी धोनी खूपच खास तयारी करत होता : सुरेश रैना 

अमेरिकन पोलिसांच्या अमानुष कृत्यामुळे जॉर्ज फ्लॉयडने नाहक आपला जीव गमावलाय. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउनची परिस्थिती असतानाही जॉर्जवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर लोक रस्त्यावर उतरत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे. या घटनेनंतर अनेक फुटबॉलपटूंनी खेळाच्या मैदानात वर्णभेदाचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली. वेस्ट इंडिज क्रिकेटर क्रिस गेल आणि डॅरेन सॅमी यांच्यानंतर आता केएल राहुलनेही यासंदर्भात आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. केएल राहुलने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

'सुन्या सुन्या मैफली'त रंग भरण्यास भारतीय क्रिकेट सज्ज; पण...

खेळाच्या मैदानात रंगाचा नव्हे तर क्षमतेला महत्त्व आहे. हीच गोष्ट जीवनालाही लागू होते. मैदानावर भेदभावाला स्थान नसते म्हणूनच आम्ही खेळावर प्रेम करतो. शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या स्वत:ला सिद्ध करण्याची कसोटी खेळाच्या मैदानात अनुभवायला मिळते. विविध संस्कृती, जात-धर्म आणि वर्ण यांना एकत्रत करण्याची क्षमता खेळात आहे. आम्ही जेव्हा 22 यार्डात असतो तेव्हा सर्व भेदभावापासून दूर असतो. याठिकाणी आम्ही एकता आणि प्रेम यावर विश्वास ठेवतो. समोरची व्यक्ती काळी आहे की गोरी, जलदगती गोलंदाज आहे की फिरकीपटू यात भेदभाव न करत एका चष्म्यातून पाहण्याचा प्रयत्न केला जातो, असे सांगत राहुलने खेळाच्या मैदानात भेदभावाला थारा नाही, असे म्हटले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या