राहुल झाले ना संघातील स्थान अखेर गुल!

मुकुंद पोतदार
Friday, 13 September 2019

मादेशात शेर-परदेशात ढेर असे चित्र टिम इंडियाच्या बाबतीत दिसते. सध्याच्या संघात याचे ठळक उदाहरण म्हणून सलामीवीर के. एल. राहुल याचे नाव घ्यावे लागेल. विंडीज दौऱ्यात बॅड पॅच आणखी तीव्र झाल्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेर डच्चू मिळाला.

मादेशात शेर-परदेशात ढेर असे चित्र टिम इंडियाच्या बाबतीत दिसते. सध्याच्या संघात याचे ठळक उदाहरण म्हणून सलामीवीर के. एल. राहुल याचे नाव घ्यावे लागेल. विंडीज दौऱ्यात बॅड पॅच आणखी तीव्र झाल्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेर डच्चू मिळाला.

राहुल द्रविडचा वारसदार म्हणून पदार्पण केलेल्या आणि अगदी काल-परवा पार पडलेल्या वर्ल्ड कपमध्ये चार नंबरसाठी पर्याय म्हणून गणना झालेल्या के. एल. राहुल याचे कसोटी संघातील स्थान अखेर गुल झाले आहे. मुळात वन-डेमध्ये सुद्धा त्याने मोक्याच्या क्षणी अपेक्षापूर्ती केली आहेच असे नाही, पण कसोटीतील त्याची कामगिरी धक्कादायक ठरली आहे.

वैविध्यपूर्ण पर्याय
त्यातही सलामीवीराची भूमिका समर्थपणे पार पाडण्यास तो सक्षम उरलेला नाही हे अलिकडे वेळोवेळी दिसून आले. सलामीच्या जागेसाठी प्रथमश्रेणीत दमदार कामगिरी केलेला कर्नाटकचाच मयांक अगरवाल आणि झटपट क्रिकेटमध्ये दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर घोडदौड करीत असलेला मुंबईकर रोहित शर्मा असे पर्याय निर्माण झाले होते.
दुय्यम प्रतिस्पर्ध्याविरुद्धही अपयशच

वेस्ट इंडिज दौऱ्यात अजिंक्य रहाणे संघातील स्थान राखत असताना आणि हनुमा विहारी हे स्थान पक्के करीत असताना राहुलने अपेक्षाभंग केला. खरे तर गेल्या मोसमात इंग्लंडला चकित केलेल्या वेस्ट इंडिजकडून मायदेशात भारताविरुद्ध जोरदार कामगिरी अपेक्षित होती, पण विंडीजची गोलंदाजी आणि एकूणच खेळ दुय्यम दर्जाचा झाला. अशा प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सुद्धा राहुल अपयशी ठरत असेल तर मग त्याचे बॅड पॅच किती तीव्र आहे हे स्पष्ट होते.
स्वप्नवत कामगिरी

राहुलने चेन्नईत इंग्लंडविरुद्ध 199 धावांची खेळी केली. डिसेंबर 2016 मधील या खेळीनंतर त्याने स्वप्नवत घोडदौड केली. त्याने 9 कसोटींमधील 14 डावांत 63.46च्या सरासरीने 825 धावा केल्या. यात 1 शतक आणि तब्बल 9 अर्धशतकांचा समावेश होता. त्याने सलामीवीर म्हणून आपले स्थान भक्कम केले होते. अर्थात या कालावधीत तो केवळ मायदेशात आणि श्रीलंकेत खेळला होता. बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याविररुद्धची ही कामगिरी होती. 

धक्कादायक अधोगती
हाच राहुल गतवर्षी जानेवारीपासून धक्का देऊ लागला. द7िण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया येथील खेळपट्यांवर त्याच्या मर्यादा उघड झाल्या. जानेवारी 2018 पासून 15 कसोटींतील 27 डावांत तो 22.23च्या सरासरीने 578 धावा करू शकला. यात एकमेव शतक, एकमेव अर्धशतक आणि चार भोपळे अशी कामगिरी आहे. अर्धशतक अफगाणिस्तानविरुद्ध बेंगळुरूला, तर शतक इंग्लंडविरुद्ध ओव्हलला आहे. ओव्हलची कसोटी पाचवी आणि अखेरची होती. भारताने मालिका त्यापूर्वीच गमावली होती. याचा अर्थ राहुलचे शतक डेड रबरमधील होते याचा उल्लेख करावा लागेल.
63 चेंडूंत सहा धावांमुळे अखेरची काडी

राहुलसाठी विंडीज दौऱ्यातील किंग्स्टनमधील (जमैका) दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातील खेळी म्हणजे अखेरची काडी ठरली. दुसऱ्या डावात तो 85 मिनिटांत म्हणजे सुमारे दीड तासांत 63 चेंडूंना सामोरे जाताना केवळ सहा धावा करू शकला. भारताने विंडीजला फॉलोऑन नाकारला होता. त्यामुळे दुसऱ्या डावात आपल्या फलंदाजांवर कसलेही दडपण नव्हते. यानंतरही राहुल फॉर्म मिळवू शकला नाही.


​ ​

संबंधित बातम्या