IPL 2019 : शमी, करन समोर दिल्लीची घसरगुंडी; पंजाबचा 14 धावांनी विजय

वृत्तसंस्था
Tuesday, 2 April 2019

आयपीएल 2019 : मोहाली : सगळं बरं सुरु असताना महंमद शमीने रिषभ पंतचा त्रिफळा उडविला आणि होत्याचं नव्हतं झालं. 15 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना कॉलिन इन्ग्रामही बाद झाला आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. 

दिल्ली कॅपिटल्स आणि  किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत पंजाबने दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळविला. ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत पंजाबने दिल्लीसमोर 167 धावांचे आव्हान दिले होते. 

दिल्लीची फलंदाजी पाहता हे आव्हान त्यांच्यासाठी सोपे होते, मात्र, पंत बाद झाल्यावर दडपणाखाली दिल्लीने दोन षटकात तीन फलंदाज गमावले. गेल्या सामन्यात 99 धावा करणाऱ्या पृथ्वी शॉने आज पुन्हा निराशा केली. आज त्याला भोपळाही फोडता आला नाही. शिखर धवन आणि श्रेयश अय्यर यांनी चांगली सुरवात देण्याचा प्रयत्न केला मात्र दोन षटकांच्या फरकाने बाद झाले. 

त्यानंतर पंत आणि इन्ग्राम यांची जोडी जमली. ही जोडी मैदानात होती तोपर्यंत दिल्लीसाठी विजय सहज होता. 21 चेंडूंमध्ये 22 धावा असे सोपे समीकरण असताना शमीने पंतचा त्रिफळा उडविला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. त्याच्या पुढच्याच चेंडूवर ख्रिस मॉरिस धावबाद झाली. 18 व्या षटकात सॅम करनने इन्ग्रामला बाद केले आणि दिल्लीच्या आशा संपुष्टात आल्या. त्याने या षटाकात हर्षल पटेललाही बाद केले. 

दिल्लीने अखेरच्या चार षटकांमध्ये पाच फलंदाज गमावले. अखेरच्या षटकात 15 धावांची गरज असताना करनने सलग दोन चेंडूवर रबाडा आणि लामाचनेचा त्रिफळा उडविला आणि पंजाबने या सामन्यात 14 धावांनी विजय मिळविला.

संबंधित बातम्या