आव्हान 18 चेंडूंत 31 धावांचे; सहा चेंडूंत काम फत्ते

वृत्तसंस्था
Saturday, 25 August 2018

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये सेंट लुशिया स्टार संघाला 18 चेंडूंत 31 धावांची गरज असताना कर्णधार किएरॉन पोलार्डने एकाच षटकात 30 धावा चोपल्या. पोलॉर्डच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे सेंट लुशिया स्टार संघाने गयाना अॅमेझॉन वारियर्स संघावर विजय मिळवला आहे. 

त्रिनिनाद : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये सेंट लुशिया स्टार संघाला 18 चेंडूंत 31 धावांची गरज असताना कर्णधार किएरॉन पोलार्डने एकाच षटकात 30 धावा चोपल्या. पोलॉर्डच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे सेंट लुशिया स्टार संघाने गयाना अॅमेझॉन वारियर्स संघावर विजय मिळवला आहे. 

या विजयामुळे सेंट लुशियाच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. पोलार्डने 18 चेंडूंमध्ये 41 धावा केल्या. त्याने 18 व्या षटकात तीन षटकार आणि चार चौकार खेचत 30 धावा काढल्या. त्यानंतर आंद्रे फ्लेचरने विजयी धाव काढली. 

सेंट लुशिया संघाला 18 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज होता. देवेंद्र बिशू या षटकात गोलंदाजी करत होता मात्र, पोलार्डने एकाच षटकात खेळ संपवला. हा त्यांचा सात सामन्यांतील फक्त दुसरा विजय आहे.

प्रथम फलंदाजी करताना गयाना संघाला सेंट लुशिया संघाच्या फिरकी गोलंदजांनी फक्त 140 धावांत रोखले. गयाना संघाला स्पर्धेतील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यामुळे त्यांना धावगतीमध्ये कमी पडल्याने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.


​ ​

संबंधित बातम्या