'खेल रत्न'साठी नीरज चोप्रा, कोहलीसह बजरंग, विनेशही शर्यतीत 

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

नवी दिल्ली : एरवी राष्ट्रीय क्रीडादिनी दिले जाणारे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता पुढे ढकलण्यात आले. आता राष्ट्रीय पुरस्कारातील सर्वोच्च "खेल रत्न' पुरस्कारासाठी भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा, कुस्तीगीर बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांची नावे जोरात चर्चेत आहेत. 

क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्कारासाठी आशियाई स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे पुरस्कार लांबणीवर पडले होते. आशियाई स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचे परीक्षण करण्यासाठी पुरस्कार समितीला वेळ देण्यात आली असून, आशियाई स्पर्धा संपल्यावर ही समिती बैठक घेऊन आधीच्या यादीत खेळाडूंची नावे वाढवू शकतात. सर्वोच्च खेल रत्न पुरस्कार जास्तीत जास्त चार खेळाडूंना देण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने आता या वेळी निश्‍चितपणे एका पेक्षा अधिक खेळाडूंना हा पुरस्कार मिळणार हे निश्‍चित आहे. 

नीरज चोप्रा, बजरंग दोघांबरोबर भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली याचेही यापूर्वीच नामांकन झाल्याचे समजते, तर विनेशच्या नावाचा विचार पुरस्कार समिती तिच्या कामगिरीवरून नव्याने करू शकते अशी चर्चा आहे. विनेश राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू आहे. नीरजची कामगिरी सातत्याने उंचावलेलीच राहिली असून, त्याची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठीदेखील करण्यात आली आहे. 

एका वर्षात किमान 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्याचा नियम करण्यात आला असला, तरी या वेळी ही संख्या वाढू शकते, अशीदेखील चर्चा आहे. 

बजरंग आणि विनेशची राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धेतील कामगिरी विलक्षण अशीच आहे. विशेषतः आशियाई स्पर्धेत त्यांनी मिळविलेले यश अधिक लक्षणीय आहे. 
- क्रीडा मंत्रालयातील एक अधिकारी

​ ​

संबंधित बातम्या