राहुल द्रविडचा आणखी एक शिष्य भारतीय संघात

वृत्तसंस्था
Saturday, 1 September 2018

राहुल 'द वॉल' द्रविड आणि भारतीय क्रिकेट हे अतूट समीकरण आहे. प्रत्यक्ष क्रिकेट खेळत असताना द्रविडने भारतीय संघासाठी अमूल्य योगदान दिलेच; शिवाय आता मार्गदर्शक, प्रशिक्षक म्हणूनही तरुण खेळाडूंना आकार देण्याचे काम द्रविडने केले आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेला आणखी एक तरुण, गुणवान खेळाडू आता भारतीय संघामध्ये दाखल झाला आहे. खलील अहमद हे त्याचे नाव! 

मुंबई : राहुल 'द वॉल' द्रविड आणि भारतीय क्रिकेट हे अतूट समीकरण आहे. प्रत्यक्ष क्रिकेट खेळत असताना द्रविडने भारतीय संघासाठी अमूल्य योगदान दिलेच; शिवाय आता मार्गदर्शक, प्रशिक्षक म्हणूनही तरुण खेळाडूंना आकार देण्याचे काम द्रविडने केले आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेला आणखी एक तरुण, गुणवान खेळाडू आता भारतीय संघामध्ये दाखल झाला आहे. खलील अहमद हे त्याचे नाव! 

आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (शनिवार) निवड झाली. त्यात खलील अहमदला संधी मिळाली आहे. खलील अवघ्या 20 वर्षांचा आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून त्याला स्थान मिळाले आहे. भारताच्या 19 वर्षांखालील संघातून खलीलने चांगली कामगिरी केली आहे. 2016 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी खलीलला चांगला सूर गवसला होता. त्या स्पर्धेपूर्वी खलीलने तीन सामन्यांत 12 गडी बाद केले होते. अर्थात, प्रत्यक्ष विश्‍वकरंडक स्पर्धेत या कामगिरीची पुनरावृत्ती त्याला करता आली नसली, तरीही भारतीय संघातील तो भरवशाचा खेळाडू आहे. 

त्याच वर्षी झालेल्या 'आयपीएल'च्या लिलावामध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने खलीलला 10 लाख रुपयांना करारबद्ध केले होते. त्यावेळी डेअरडेव्हिल्सचे प्रशिक्षक द्रविड होते. त्यानंतर द्रविड यांनी 19 वर्षांखालील भारतीय संघ आणि भारत 'अ' संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खलीलने उल्लेखनीय प्रगती केली आहे. पृथ्वी शॉ, रिषभ पंत हे द्रविड यांचे शिष्य स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. 

आतापर्यंत खलीलने 17 प्रथमश्रेणी सामन्यांत 28.4 च्या सरासरीने 28 गडी बाद केले आहेत. भारतीय संघात सध्या दर्जेदार वेगवान गोलंदाज असले, तरीही सध्या चांगला डावखुरा वेगवान गोलंदाज नाही. झहीर खाननंतर भारताला सातत्यपूर्ण कामगिरी करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मिळालेला नाही.


​ ​

संबंधित बातम्या