गँबलर ते जगज्जेता अन् स्वदेशी विजेता सुद्धा

मुकुंद पोतदार
Monday, 17 September 2018

देशप्रेम हे जपानच्या क्रीडापटूंचेच नव्हे तर त्या देशाच्या नागरीकांचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धातील अणुबाँबच्या हल्यातून हा देश सावरू शकला आणि विविध क्षेत्रांत जगात लौकीक निर्माण करू शकला. क्रीडा क्षेत्रात सुद्धा जपानी क्रीडापटू आपला ठसा उमटवित असतात. यंदा बॅडमिंटनमध्ये केंटो मोमोटाने गेल्याच महिन्यात जागतिक स्पर्धा जिंकली. जपानचा तो पहिला जगज्जेता बॅडमिंटनपटू ठरला. याहून गोड ठरेल असा पराक्रम त्याने केला. जपान ओपन स्पर्धा  जिंकलेला तो पहिला जपानी बॅडमिंटनपटू ठरला.

देशप्रेम हे जपानच्या क्रीडापटूंचेच नव्हे तर त्या देशाच्या नागरीकांचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धातील अणुबाँबच्या हल्यातून हा देश सावरू शकला आणि विविध क्षेत्रांत जगात लौकीक निर्माण करू शकला. क्रीडा क्षेत्रात सुद्धा जपानी क्रीडापटू आपला ठसा उमटवित असतात. यंदा बॅडमिंटनमध्ये केंटो मोमोटाने गेल्याच महिन्यात जागतिक स्पर्धा जिंकली. जपानचा तो पहिला जगज्जेता बॅडमिंटनपटू ठरला. याहून गोड ठरेल असा पराक्रम त्याने केला. जपान ओपन स्पर्धा  जिंकलेला तो पहिला जपानी बॅडमिंटनपटू ठरला. 1977 मध्ये प्रारंभ झाल्यापासून 41 वर्षांच्या इतिहासात एकाही जपानी खेळाडूला ही कामगिरी करता आली नव्हती.

मोमोटाला रिओ ऑलिंपिकपूर्वी गँबलिंगमुळे बंदीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे 24 वर्षांच्या या खेळाडूला खूप काही सिद्ध करून दाखवायचे होते. गँबलिंगमुळे देशाच्या नाचक्कीस तो कारणीभूत ठरला होता. आपल्या देशाची अशी घोर प्रतारणा केल्यामुळे त्याच्यावर टीका झाली. त्याला जेव्हा उपरती झाली तेव्हा उशीर झाला होता. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असूनही त्याला रिओ ऑलिंपिकला मुकावे लागले. त्याआधीच्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये त्याने जाकार्तामधील जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक मिळविले होते. 

 

भावना देशप्रेमाचीच

 

वास्तविक रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊन फुकुशीमामधील अणूभट्टीस्फोटातील मृतांना आदरांजली अर्पण करण्याची त्याची भावना होती. याचे कारण फुकुशीमामध्येच त्याचे बालपण गेले. गँबलिंगची जुगार खेळण्याची चूक झाल्याबद्दल त्याने पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली. तो भावविवश झाला. थेट प्रक्षेपण झालेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला होता की, रिओ ऑलिंपिकमधील सहभागाद्वारे फुकुशीमातील बांधवांसाठी आनंद निर्माण करून त्यांना बळ देण्याची माझी इच्छा होती. पाठिंबा दिलेल्या आणि अपेक्षा ठेवलेल्या प्रत्येकाची फसवणूक केल्याबद्दल मला तीव्र खेद वाटतो. जपानच्या संघाचे नेतृत्व करणे माझे कर्तव्य होते, पण फाजील उत्सुकतेला मी बळी पडलो.

 

मोमोटाच्या चुकीमुळे निप्पॉन बॅडमिंटन असोसिएशनचे सरचिटणीस जनरल किंजी झेनीया यांना अश्रू अनावर झाले होते. टोकियोतील अनधिकृत कॅसिनोत मोमोटा सहा वेळा गेला. त्याने पाच लाख येन उधळले. तशी कबुली त्याने दिली. त्यामुळे ऑलिंपिक मंत्री तोशीयाकी एन्डो यांनीही त्याचा धिक्कार केला. ही ऑलिंपिक तत्त्वांची फसवणूक आहे. दोषी सिद्ध झाल्यास त्याच्यावर शंभर टक्के बंदी येईल.

 

वास्तविक मोमोटाने दुबईतील सुपर सिरीज मास्टर्स फायनल्स सुद्धा जिंकली होती. ही कामगिरी केलेला तो पहिला जपानी बॅडमिंटनपटू होता. तसे पाहिले तर गँबलिंग केल्याबद्दल दोषी ठरल्यास जपानमध्ये पाच वर्षांपर्यंत कारावसाची शिक्षा होऊ शकते. त्यातही एका खेळाडूने हे करणे आणखी धक्कादायक ठरले होते.

 

मोमोटासमोर बंदीनंतर पुनरागमनाच्या मार्गात लौकीक पुन्हा कमावणे हे आव्हान होते. या आघाडीवर त्याने महत्त्वाचा टप्पा गाठला. दोन वेळचा ऑलिंपिक विजेता चीनचा लिन डॅन आणि आजघडीचा अव्वल खेळाडू व्हिक्टर अॅक्सेलसन यांना हरवित मोमोटाने आगेकूच केली. अंतिम फेरीत त्याने थायलंडच्या खोसीत फेतप्रदाब याला हरवित जेतेपद साकार केले.

 

हे यश म्हणजे ऑलिंपिकसाठी शुभशकून असल्याचे त्याला वाटते, पण इतक्यात ऑलिंपिकचा विचार न करता पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रीत करायचे असे त्याने ठरविले आहे. लिन डॅन हा त्याचा ऑयडॉल आहे. त्याने कारकिर्दीत प्रथमच आपल्या हिरोला हरविले. जगज्जेतेद ही सर्वोच्च कामगिरी असली तरी त्याने मायदेशातील ही स्पर्धा जिंकल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे. मोमोटासाठी हे यश बहुमोल आहे. याचे कारण याच मासुहिनो फॉरेस्ट स्पोर्ट प्लाझामध्ये 2020 ऑलिंपिकमधील बॅडमिंटनची स्पर्धा रंगणार आहे. मोमोटाच्या कारकिर्दीतील गँबलिंगमुळे अपशकून घडून गेला. यापुढे केवळ शुभशकून घडतील यासाठी तो प्रयत्न करीत आहे आणि त्याला फळ मिळत आहे.


​ ​

संबंधित बातम्या