केदार जाधवची कोरोनाग्रस्तासाठी अनोखी मदत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

सध्या राज्यात रक्तसंकलन घटले आहे, दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या शिल्लक आहे. रक्त उपलब्ध नसेल तर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी केदार जाधावने मोठेपणा दाखवून त्याचा 35 वा वाढदिवस कोरोनाग्रस्त रुग्णासाठी रक्तदान करुन साजरा केला.

भारतात लॉकडाउन असल्याने आत्यवश्यक सेवा तेवढ्या सुरु आहेत, सगळ्यांना घरात अडकून पडावे लागले आहे. अशा वेळी अनेक दिग्गज खेळाडू कोरोनाग्रस्तांसाठी आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहेत. पण भारतीय संघाचा ऑलरांउडर फलंदाज केदार जाधवने पुण्यात एका गरजू रुग्णासाठी हॉस्पिटलमध्ये जाइऊ रक्तदान कले. त्याच्या या चांगल्या कामाची सोशल मिडीयावर जोरदार स्तुती केली जात आहे. 

ऑलिम्पिकच्या स्थगीतीने नरसिंगला ऑलिम्पिक पात्रतेची संधी

सध्या राज्यात रक्तसंकलन घटले आहे, दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या शिल्लक आहे. रक्त उपलब्ध नसेल तर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी केदार जाधावने मोठेपणा दाखवून त्याचा 35 वा वाढदिवस कोरोनाग्रस्त रुग्णासाठी रक्तदान करुन साजरा केला. एका एनजीओने केदारचा रक्तदान करत असतानाच्या फोटो शेअर करत रक्तदान करण्यासाठी त्याचे आभार मानले आहेत. कोरोनाच्या फैलावने लोकांचे घराच्या बाहेर पडणे बंद झाले आहे, त्यामुळे रक्तपेढ्यातील रक्तसाठा कमी होत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लोकांना गर्दी न करता रक्तदान करण्याचे अवाहन केले होते.

करोनाग्रस्तांसाठी सिंधूने दिले 10 लाख

जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्याता आल्या आहेतच,. भारतीय़ संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करण्यात आला आहे, त्यासोबत आयपीएल देखील रद्द होण्याच्या मार्गावऱ आहे सध्यातरी ते 15 एप्रिलपर्यंत स्थगीत करण्यात आले आहे. त्यामुळे सगळे खेळाडू सराव सोडून घरातच राहत आहेत. 

देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 600  च्या वर पोहचली आहे तर देशभरात 13 लोकांनी जीव गमावला आहे. जगात तर हे आकडे आणखीणच गंभीऱ आहेत. आजवर साडे चार लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना झाला आहेतर 21 हजारापेक्षा जास्त जणांना त्यांचा जी गमावला आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या