Vijay Hazare Trophy : महाराष्ट्राचा संघ जाहीर; केदार जाधवकडे कर्णधारपद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 September 2019

विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी अष्टपैलू केदार जाधव याची महाराष्ट्राच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. राहुल त्रिपाठी उपकर्णधार असलेल्या संघात अनुभवी आणि नवोदितांचा मिलाफ साधण्यात आला आहे. नवनियुक्त रणजी निवड समितीप्रमुख मिलिंद गुंजाळ यांच्या समितीने संघ जाहीर केला. बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर निवड चाचणी सामने झाले. त्यातून ही निवड झाली.

पुणे : विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी अष्टपैलू केदार जाधव याची महाराष्ट्राच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. राहुल त्रिपाठी उपकर्णधार असलेल्या संघात अनुभवी आणि नवोदितांचा मिलाफ साधण्यात आला आहे. नवनियुक्त रणजी निवड समितीप्रमुख मिलिंद गुंजाळ यांच्या समितीने संघ जाहीर केला. बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर निवड चाचणी सामने झाले. त्यातून ही निवड झाली.

INDvsSA : अन् पंतमुळे विराटला तोंड दाखवायला जागा उरली नाही

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) सचिव रियाझ बागवान यांनी संघ जाहीर केला. पहिल्या दोनच सामन्यांसाठी निवड करण्यात आली. महाराष्ट्र एलिट विभागातील "ब' गटात आहे. बडोद्यात 24 सप्टेंबर ते 13 ऑक्‍टोबर या कालावधीत लढती होतील. 

संघ : केदार जाधव (कर्णधार), राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, यश नहार, अंकित बावणे, नौशाद शेख, दिव्यांग हिंगणेकर, शमशुझ्मा काझी, सत्यजित बच्छाव, समद फल्ला, मुकेश चौधरी, मनोज यादव, अवधूत दांडेकर (यष्टिरक्षक), अझीम काझी, स्वप्नील गुगळे, निकीत धुमाळ. 

महाराष्ट्राच्या लढती : 24 सप्टेंबर वि. हिमाचल, 26 सप्टें. वि. उत्तर प्रदेश, 28 सप्टें. वि. बडोदा, 29 सप्टें. वि. पंजाब, 3 ऑक्‍टोबर वि. दिल्ली, 7 ऑक्‍टो. वि. विदर्भ, 9 ऑक्‍टो. वि. ओडिशा, 13 ऑक्‍टो. वि. हरियाना. 
 


​ ​

संबंधित बातम्या