मयांकची घरवापसी लकी; कर्नाटकने जिंकला विजय हजारे करंडक

वृत्तसंस्था
Saturday, 26 October 2019

आपला 30 वा वाढदिवस हॅटट्रिकने साजरा करणाऱ्या अभिमन्यू मिथूनने हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकच्या विजेतेपदामध्ये मोलाचा वाटा उचलला. पावसाचा व्यत्यय आलेल्या अंतिम सामन्यात कर्नाटकने तमिळनाडूचा सहज पराभव केला. 

बंगळुर : आपला 30 वा वाढदिवस हॅटट्रिकने साजरा करणाऱ्या अभिमन्यू मिथूनने हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकच्या विजेतेपदामध्ये मोलाचा वाटा उचलला. पावसाचा व्यत्यय आलेल्या अंतिम सामन्यात कर्नाटकने तमिळनाडूचा सहज पराभव केला. 

17च सामने खेळलाय हा, आधी याला हाकला बरं!

रणजी करंडक आणि आता हजारे स्पर्धा अशा दोन्ही राष्ट्रीय स्पर्धांत हॅटट्रिक करणारा मिथून दुसरा गोलंदाज ठरला आहे. तमिळनाडूच्या डावात अखेरच्या षटकात मिथूनने हॅटट्रिक केली. शहारुख खान, एम. महम्मद आणि मुरुगन अश्‍विन यांना अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर बाद केले. 

Image

प्रथम फलंदाजी करणाऱ्या तमिळनाडूकडे मुरली विजय, अभिनव मुकुंद, बाबा अपराजित, विजय शंकर, दिनेश कार्तिक, वॉशिंग्टन सुंदर अशी फलंदाजांची चांगली फौज असतानाही त्यांना 252 धावा करता आल्या. पण सध्या टीम इंडियाच्या कसोटी संघातील हुकमी सलामीवीर मयांक अगरवाल आणि संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असलेला केएल राहुल यांनी वेगवान फलंदाजी करत कर्नाटकचा विजय सोपा केला. 

253 धावांच्या आव्हानासमोर पावसाची शक्‍यता लक्षा घेऊन राहुल आणि अगरवाल यांनी धावांचा वेग वाढवला होता. अखेर 23 व्या षटकांत खेळ थांबला तेव्हा कर्नाटकने 1 बाद 146 धावा केल्या होत्या तेव्हा डकवर्थ लुईसनुसार त्यांना विजयासाठी 1 बाद 87 धावा करणे आवश्‍यक होते. त्यानंतर खेळ पुढे होऊ न शकल्यामुळे कर्नाटकने हा सामना 60 धावांनी जिंकला. अगरवालने 55 चेंडत नाबाद 69 धावा केल्या. 

एवढे भारी खेळतात आता तरी या दोघांचे वेतन वाढवा की; गांगुलीला गळ 

त्या अगोदर तमिळनाडूची सुरुवात खराब होती. मिथूनने मुरली विजयला शुन्यावर बाद केले. आर. अश्‍विनला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्याचा प्रयत्न फसल्यावर बाबा अपराजितने अर्धशतक करून डाव सावरला. विजय शंकरने 38 धावांचे योगदान दिले पण अभिनव मुकुंदने 85 धावा करून एक बांजू सांभाळली होती. 

संक्षिप्त धावफलक : 
तमिळनाडू : 49.5 षटकांत सर्वबाद 252 (अभिनव मुकुंद 85 -110 चेंडू, 9 चौकार, बाबा अपराजित 66 -84 चेंडू, 7 चौकार, विजय शंकर 38 -35 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, अभिमन्यू मिथून 9.5-0-34-5, कौशिक 9-0-39-2) पराभूत वि. कर्नाटक ः 23 षटकांत 1 बाद 146 (केएल राहुल नाबाद 52 -72 चेंडू, 5 चौकार, मयांक अगरवाल नाबाद 52 -चेंडू 7 चौकार, 3 षटकार)


​ ​

संबंधित बातम्या