कपिल यांच्या वर्ल्डकपपासून आनंद महिंद्रा यांनी कशी घेतली स्पूर्ती नक्की वाचा !!

शैलेश नागवेकर
Thursday, 25 June 2020

२५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला आहे. आज त्या दिवसाला ३७ वर्षे पूर्ण झाली. आणि त्या दिवसापासून भारतात क्रिकेटची क्रांती सुरू झाली. अनेकांना विजयाचा आत्मविश्वास कपिलदेव यांच्या विश्वविजेत्या संघाने मिळवून दिला होता. कपिलदेव यांच्या संघाचे ते अभूतपूर्व यथ केवळ क्रिकेटपूरतेच मर्यादित नव्हते, तर यशस्वी उद्योजक आनंद महिंद्रा यांनाही यशाचा मार्गाचा बोध झाला होता.

मुंबई : २५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला आहे. आज त्या दिवसाला ३७ वर्षे पूर्ण झाली. आणि त्या दिवसापासून भारतात क्रिकेटची क्रांती सुरू झाली. अनेकांना विजयाचा आत्मविश्वास कपिलदेव यांच्या विश्वविजेत्या संघाने मिळवून दिला होता. कपिलदेव यांच्या संघाचे ते अभूतपूर्व यथ केवळ क्रिकेटपूरतेच मर्यादित नव्हते, तर यशस्वी उद्योजक आनंद महिंद्रा यांनाही यशाचा मार्गाचा बोध झाला होता.

वास्तविक पहाता कपिदेव यांचा संघ विश्वविजेता होईल असे कोणालाही वाटत नव्हते, पण कपिदेव यांच्या संघातील सर्व खेळाडूंत मात्र आत्मविश्वास नसानसात भिनला होता. महाबलाढ्य वेस्ट इंडीज, ताकदवर ऑस्ट्रेलिया यांसारखे संघ असताना विश्वविजेतेपदाला गवसणी घालणे सोपे नव्हते, परंतु आत्मविश्वास असेल तर शिखरही पार करता येते ते त्यावेळी सिद्ध झाले होते.

कपिलदेव यांनी विश्वकरंडक उंचावताच तमाम भारतीयांमध्ये स्फूरण चढले होते. क्रिकेटकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला होता. आपल्याला सुद्धा असेच यश मिळवायचे आहे, असा विचार कपिलदेव यांच्या संघाचा खेळ पाहून आपण केला, असे दस्तूरखुद्द सचिन तेंडुलकरने सांगितलेले आहे. त्यानंतर सचिनकडे पाहून महेंद्रसिंग धोनी, विराट कोहलीसारखे दिग्गज घडले...हा आत्ताचा इतिहास आणि वर्तमानही आहे. अजूनपर्यंत आपण कपिलदेव यांच्या संघाचे यश पाहून क्रिकेटपटू घडले असे अनेकदा वाचले आहे, पण त्या संघाच्या यशापासून आयुषात यश मिळवण्याचा मार्ग सापडला असल्याचे क्वचितच ऐकले असेल.

आजच्या या दिवसाचे निमित्त साधून आनंद महिंद्रा यांनी आपली आठवण ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे, ते म्हणतात...१८८१ मध्ये मी माझी व्यावसाईक कारकिर्द सुरू केली होती दोन वर्षांनी मला प्रथमच व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळाली. फ्रान्सचा तो दौरा होता. एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आम्ही बसलो होतो. त्या रेस्टॉरंटचा मालक रेडियोवर समालोचन ऐकत होता आणि भारत जिंकताच त्याने आम्हा सर्वांना ती गोड बातमी दिली...आम्ही सर्व उभे राहून विजयोत्सव केला...प्रयत्न केल्यावर काहीही अशक्य नाही, याची मला या दिवशी जाणीव झाली...
  
कपिलदेव यांच्या संघातील काही खेळाडू आपापल्या आठवणी शेअर करत आहेत, पण आनंद महिंद्रा यांचा अनुभव सोशल मिडियावर सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे.


​ ​

संबंधित बातम्या