कपिल देव पुन्हा खेळणार भारतीय संघाकडून

वृत्तसंस्था
Monday, 30 July 2018

भारतीय संघातून निवृत्ती घेऊन 24 वर्षांनंतरही भारताचे माजी कर्णधार कपिल देव भारतीय संघातून खेळणार आहे. मात्र यावेळी ते फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून नाही तर गोल्फर म्हणून खेळणार आहे. 

नवी दिल्ली : भारतीय संघातून निवृत्ती घेऊन 24 वर्षांनंतरही भारताचे माजी कर्णधार कपिल देव भारतीय संघातून खेळणार आहे. मात्र यावेळी ते फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून नाही तर गोल्फर म्हणून खेळणार आहे. 

ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या आशिया पॅसिफिक सिनिअर्स स्पर्धेतील भारतीय संघात कपिल देव यांची निवड करण्यात आलेली आहे. 

''हा खेळ क्रिकेटसारखाच नसला तरी मी मला पुन्हा देशाचे प्रतिनिधित्व करण्यास मिळणार आहे यासाठी मी खूश आहे.'' असे मत त्यांनी व्यक्त केले. जुलै महिन्यात झालेल्या ऑल इंडिया सिनिअर्स स्पर्धेतील कामगिरीवर कपिल देव यांची निवड करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या