'बोलंदाजी'वर कपिल पाजींनी जिंकलं होत पार्टनरचं मन, असं केलेलं फिल्मी स्टाइल प्रपोज   

टीम ई-सकाळ
Thursday, 25 June 2020

भारतीय क्रिकेट संघाला विश्वविजेता बनवण्याचा पराक्रम करुन दाखवणाऱ्या कपिल देव यांच्यावर 25 जून या दिवशी अखंडित असा प्रेमाचा वर्षाव होत असल्याचे आपण गेल्या तीन दशकाहून अधिक काळ पाहतोय. क्रिकेटच्या मैदानातील अविस्मरणीय घटनेला इथून पुढेही असाच उजाळा मिळत राहिल. सध्याच्या घडीचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, माजी क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी हे नेहमी क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीसह मैदानाबाहेरील आपल्या  जोडीदारासोबतच्या पार्टनरशीपच्या गोष्टींमुळे अनेकदा चर्चेत असतात. कपिल पाजींच्या प्रेमाचा किस्सा या नव्या दमाच्या क्रिकेटर्ससारखाच भन्नाट आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला विश्वविजेता बनवण्याचा पराक्रम करुन दाखवणाऱ्या कपिल देव यांच्यावर 25 जून या दिवशी अखंडित असा प्रेमाचा वर्षाव होत असल्याचे आपण गेल्या तीन दशकाहून अधिक काळ पाहतोय. क्रिकेटच्या मैदानातील अविस्मरणीय घटनेला इथून पुढेही असाच उजाळा मिळत राहिल. सध्याच्या घडीचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, माजी क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी हे नेहमी क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीसह मैदानाबाहेरील आपल्या  जोडीदारासोबतच्या पार्टनरशीपच्या गोष्टींमुळे अनेकदा चर्चेत असतात. कपिल पाजींच्या प्रेमाचा किस्सा या नव्या दमाच्या क्रिकेटर्ससारखाच भन्नाट आहे.
   
कपिल देव यांची प्रेम कहाणी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. कपिल देव यांनी रोमी भाटियांना फिल्मी स्टाइलमध्ये आणि अनोख्या अंदाजात प्रपोज केलं होतं. क्रिकेटच्या मैदानात मोक्यावर चौका मारण्यात माहिर असलेल्या कपिल यांनी प्रेमाच्या खेळातही आपल्या खास शैलीत बोलंदाजी करत प्रेमाचा सामना जिंकला होता. रेल्वेमध्ये आपल्या समोरच्या सीटवर बसलेल्या रोमीच्या प्रेमात घायाळ झालेल्या कपिल पाजींनी प्रेमाचा होकार मिळवण्यासाठी क्षणाचाही विलंब लावला नाही. रेल्वे गाडी एका सुंदर मार्गावरुन धावत असताना कपिल पाजी रोमी यांना म्हणाले होते की, "या सुंदर जागेचा फोटो घेणं पसंत करशील का? जो भविष्यात आपण आपल्या मुलांना दाखवू शकेन" कपिल पाजींची ही बोलंदाजी क्रिकेटच्या मैदानातील प्रतिस्पर्धीला टाकलेल्या यॉर्करप्रमाणेच होती. कदाचित त्यामुळेच यावर रोमी थोड्या गोंधळल्या पण चांगली गोष्ट ही की त्यांनी हो.... असं उत्तर देत कपिल पाजींनी दिलेलं प्रेमाच प्रपोज स्वीकारलं.

रेल्वेच्या प्रवासात सुरु झालेली ही प्रेम कहाणी हळूहळू आणखी फुलत गेली. दोघांच्यात प्रेम फुलले पण दोघांच्या कुटुंबियांना हे मान्य नव्हते. कपिल पाजींनी तर पळून जाउन लग्न करण्याचा विचार केला होता. पण रोमींनी याला होकार दिला नाही. घरच्यांची मनं दुखवनं त्यांना पटलं नाही.  दोघांच्यामध्ये फोनवर खूप वेळ बोलणं व्हायचं. टेलिफोनच बील खूप येत असल्यामुळे वडिलांनी लँडलाइनच कनेक्शन बंद केलं होतं असा किस्साही खुद्द पाजींनी एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. मैदानात ज्या जिद्दीनं कपिल पाजी सामना करायचे ती जिद्द त्यांनी प्रेमाच्या लढाईतही दाखवली. रोमी यांच्याशी गप्पा करण्यासाठी क्रिकेट खेळायला एअरपोर्ट येताना ते तासभर अगोदार हजर व्हायचे. अन् एअरपोर्टशेजारील बूथ मधून ते रोमी यांच्याशी गप्पा मारायचे. ही जोडी आपल्या मतावर ठाम राहणार हे दोन्ही कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर अखेर 1980 मध्ये कुटुंबियांच्या संमतीने दोघांनी संसार थाटला होता.


​ ​

संबंधित बातम्या