Kai Po Che ते IPL : बघा दिग्विजय देशमुखचा स्वप्नवत प्रवास!

वृत्तसंस्था
Saturday, 21 December 2019

हो मी दिग्विजय आहे आणि मी काय पो चे चित्रपटात अलीची भूमिका केली होती. मी कधीच अभिनेता नव्हतो. मी नेहमीच एक क्रिकेटपटू होतो. आता हळूहळू मला माझं स्वप्न कळायला लागलं आहे.

स्वप्न पूर्ण होतात, कष्ट केले की स्वप्न नक्कीच पूर्ण होतात आणि दिग्विजय देशमुख याच्याशी नक्कीच सहमत असेल. दिग्विजय देशमुख याने अजूनही आपल्या खेळाने सर्वांची मनं जिंकायची आहेत मात्र, देशभरात तो आधीच खूप प्रसिद्ध झाला आहे. हा तोच मुलगा आहे ज्याला सुशांतसिंह राजपूतच्या पहिल्या 'काय पो चे' चित्रपटात गोट्या खेळायला प्रचंड आवडायचे आणि जो उत्तुंग षटकार मारायचा. चित्रपटाच्या अखेराला तो टीम इंडियात खेळताना दिसत आहे. तोच दिग्विजय आता खरा क्रिकेटर बनला असून त्याला यंदाच्या आयपीएलच्या मोसमात मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for digvijay deshmukh

मुंबई इंडियन्सने दिग्विजय देशमुखला 20 लाख रुपयांना करारबद्ध केले आहे. ''हो मी दिग्विजय आहे आणि मी काय पो चे चित्रपटात अलीची भूमिका केली होती. मी कधीच अभिनेता नव्हतो. मी नेहमीच एक क्रिकेटपटू होतो. आता हळूहळू मला माझं स्वप्न कळायला लागलं आहे,'' असे मत त्याने व्यक्त केले आहे. 

INDvsWI : अंतिम सामन्याआधी टीम इंडिया करतीये अशी मजा, बघा फोटो!

Image result for digvijay deshmukh

'काय पो चे'बद्दल बोलताना तो म्हणाला, ''मी मुंबईमध्ये 14 वर्षांखालील स्पर्धेत खेळण्यासाठी गेलो होतो. तेव्हा चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाने माझी0 ऑडिशनसाठी निवड केली आणि त्यानंतर मला रोल मिळाला. मी, सुशांत आणि राजकुमार राव खूप क्रिकेट खेळायचो. मी फक्त क्रिकेट खेळायचंय म्हणून तो चित्रपट केला. मला कुणी अभिनेता म्हणालं तर राग येतो. चार महिने बाहेर राहिल्याने माझ्या क्रिकेटवर त्याचा खूप दुष्परिणाम झाला त्यामुळे मला पुन्हा हे कधीच करायचं नाही.'' 


​ ​

संबंधित बातम्या