Asian Games 2018 : न्यायालयाचा आदेश झुगारून कबड्डीपटूंना बक्षीस प्रदान 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 September 2018

मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डी पदक विजेत्यांना अंतिम आदेश येईपर्यंत कोणतेही बक्षीस देऊ नये, असा न्यायालयाचा आदेश असतानाही त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदक विजेत्यांच्या सोहळ्यात रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले असल्याचे समजते. 

कबड्डी संघाच्या निवडीविरोधात राजरत्नम तसेच होनप्पा यांनी न्यायालयात याचिका सादर केली होती, त्या वेळी याबाबत निर्णय देताना न्यायालय निर्णय अंतिम सुनावणीच्यावेळी घेईल असे सांगितले होते. त्याचबरोबर 15 सप्टेंबरला दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये चाचणी घेण्यास सांगितले आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना दिल्लीतील खास कार्यक्रमात गौरवण्यात आले. त्या वेळी वैयक्तिक सुवर्णपदकासाठी 40, रौप्यपदकासाठी वीस तर ब्रॉंझसाठी दहा लाख देण्यात आले. याचबरोबर सांघिक पदकासाठी हीच रक्कम पन्नास टक्के होती. एकंदर 19.98 कोटी रुपयांच्या बक्षिसाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात कबड्डीसह सर्व खेळातील खेळाडू उपस्थित होते, असे क्रीडा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या पदक विजेत्यांना गृहमंत्री राजनाथ सिंग, क्रीडामंत्री राजवर्धन राठोड, किरण रिज्जू, महेश शर्मा यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. 

रोख बक्षिसे देण्यात आलेल्या खेळाडूंत कबड्डीपटूही आहेत, हे कळल्यावर गेहलोत यांच्या पत्नीच्या निवडीस न्यायालयात आव्हान देणारे महिपाल यांना धक्काच बसला. त्यांना बक्षिसे देऊ नयेत, ही न्यायालयाची प्रत सर्वांनाच पाठवण्यात आली होती, याकडे लक्ष वेधले. 

​ ​

संबंधित बातम्या