इटालियन कप मधील परभवानंतर सेरी ए मध्ये जुवेंटसचे दमदार पुनरागमन 

टीम ई-सकाळ
Tuesday, 23 June 2020

जुवेंटस संघाला इटालियन कपच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारल्यानंतर पेनल्टी शूटआउट मध्ये नैपोली कडून हार पत्करावी लागली होती.

सेरी ए फुटबॉल चैंपियनशिप मध्ये जुवेंटस संघाने बोलोग्नावर २ - ० ने विजय मिळवत स्पर्धेतील आपली स्थिती भक्कम केली आहे. काल सोमवारी जुवेंटस आणि बोलोग्ना यांच्यात झालेल्या सामन्यात जुवेंटस संघातील क्रिस्टियानो रोनाल्डो आणि पाउलो डायबाला यांनी प्रत्येकी एक - एक गोल नोंदवले. दरम्यान यापूर्वी जुवेंटस संघाला इटालियन कपच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारल्यानंतर पेनल्टी शूटआउट मध्ये नैपोली कडून हार पत्करावी लागली होती. त्यामुळे जुवेंटस संघाने इटालियन कप मधील हा पराभव विसरत सेरी ए फुटबॉल चैंपियनशिप मध्ये दमदार पुनरागमन केले आहे.

आता 'या' फुटबॉल लीगमध्ये सामन्यापूर्वी खेळाडू आढळला कोरोना पॉझिटिव्ह            

सेरी ए फुटबॉल चैंपियनशिप मध्ये सोमवारी झालेल्या जुवेंटस आणि बोलोग्ना यांच्या सामन्यादरम्यान क्रिस्टियानो रोनाल्डोने २३ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा उपयोग करत गोल केला. तर पाउलोने ३६ व्या मिनिटाला मैदानावर गोल नोंदवला. इटालियन कप स्पर्धेत सलग नऊ वेळा खिताब जिंकलेल्या जुवेंटसने सेरी ए फुटबॉल चैंपियनशिपच्या गुणतालिकेत नेहमीच्या प्रतिद्वंद्वी लाजियो संघावर चार अंकांनी बढत कायम ठेवली आहे. लाजियोचा संघ २६ सामन्यांमध्ये ६२ गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर असून, जुवेंटसने २७ सामन्यात ६६ गुण मिळवत अग्रस्थान कायम राखले आहे. तसेच उद्या बुधवारी लाजियोचा अटलांटा सोबत होणार आहे.   

जोकोविकसोबत भिडलेल्या या खेळाडूला कोरोनाची लागण; आता...

दरम्यान, इंटर मिलानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून, या संघाने २६ सामन्यांमध्ये १७ सामन्यात विजय मिळवत ५७ गुण मिळवले आहेत. तर अटलांटा ५१ गुणांसह चौथ्या स्थानावर आणि रोमा ४५ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.      

      


​ ​

संबंधित बातम्या