बाबांच्या मर्जीविरुद्ध क्रिकेट खेळला अन् आता टीम इंडियाचा कर्णधार झाला

वृत्तसंस्था
Monday, 2 December 2019

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडकासाठी भारताचा संघ आज जाहीर केला आहे. या संघाचा कर्णधार म्हणून मेरठच्या प्रियम गर्गची निवड करण्यात आली आहे. मात्र, लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याला आपण गरिब आहोत, मी तुला क्रिकेटपटू बनवू शकत नाही असे सांगत क्रिकेट खेळण्यास मनाई केली होती. मात्र, या सगळ्यावर मात करत तो आज भारतीय संघाचा कर्णधार झाला आहे. 

अखेर टीम इंडिया सुटली; प्रसाद यांचा कालवधी संपला

पिता ने कहा- हम गरीब हैं, तुम्हें क्रिकेटर नहीं बना सकते, अब बेटा वर्ल्ड कप में करेगा भारत की कप्तानी!

भारतीय संघात अनेक गुणी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. अनेक स्पर्धांमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेल, यशस्वी जैसवाल, दिव्यांश सक्सेना यांनी संघात स्थान देण्यात आले आहे. 

कोण आहे प्रियम गर्ग?
प्रियम उत्तर प्रदेशातील मेरठमधील एक उभरता तारा आहे. त्याने सात वर्षांचा असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला फलंदाजी करताना पाहिलं होतं आणि त्यानंतर त्यानं क्रिकेटपटू होण्याचं ठरवलं होतं. मात्र, त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्यास मनाई केली होती. त्याचे फलंदाजीतील कौशल्य पाहून त्याच्या मामाने त्याला मेरठच्या व्हिक्टोरिया स्टेडियममध्ये प्रशिक्षण मिळवून दिले आणि त्यानंतर या पोरानं मागे वळून पाहिलेलं नाही. त्याने 11 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 67.83 च्या सरासरीने 814 धावा केल्या आहेत ज्यामध्ये दोन द्विशतकांचा समावेश आहे. 

Breaking : विश्वकरंडकासाठी टीम इंडियाचा तगडा संघ जाहीर

टीम इंडिया चार वेळा विश्वविजेते
भारतीय संघाने चार वेळा 19 वर्षांखालील विश्वकरंडकाचे विजेतपद पटकाविले आहे. 2018मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली भारताने विश्वकरंडक जिंकला होता त्यामुळे भारतीय संघ आता गतविजेते म्हणून स्पर्धेत जाणार आहे. 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत हा विश्वकरंडक होणार आहे. 

​ ​

संबंधित बातम्या