Happy Birthday Hardik :  उधारीवर क्रिकेट किट घेऊन घडला हार्दिक पंड्या

वृत्तसंस्था
Friday, 11 October 2019

भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याची आर्थिक परिस्थिती आता चांगलीच भक्कम असली तरी एकेकाळी त्याला खायलाही पैसै नव्हते हे सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. 19 वर्षांखालील संघात क्रिकेट खेळताना त्याच्याकडे पैशांची एवढी चणचण होती की तो मॅगी खाऊन दिवस काढायचा. 

Happy Birthday Hardik Pandya : नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याची आर्थिक परिस्थिती आता चांगलीच भक्कम असली तरी एकेकाळी त्याला खायलाही पैसै नव्हते हे सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. 19 वर्षांखालील संघात क्रिकेट खेळताना त्याच्याकडे पैशांची एवढी चणचण होती की तो मॅगी खाऊन दिवस काढायचा. 

INDvsSA : त्याचं नेहमीचंय, मला डिवचायला आवडतं त्याला! : पुजारा

तसेच 17 वर्षांचा असताना त्याच्याकडे खेळण्यासाठी क्रिकेट किटही नव्हते. तो बडोदा क्रिकेट असोसिएशनकडून उधारीवर क्रिकेट किट घेऊन सराव करायचे.

भारतीय संघातील याच अष्टपैलूचा आज 26वा वाढदिवस आहे. 11 ऑक्टोबर 1993मध्ये त्याचा जन्म झाला. आता त्याच्या लक्झरी लाईफ आणि स्टाईलमुळे तो खूप प्रसिद्ध असला तरी सुरवातीच्या काळात त्याने खूप संघर्ष केला आहे. 

त्याच्या वडिलांचा सुरतमध्ये छोटासा व्यवसाय होता. हार्दिक पाच वर्षांचा असताना त्यांचा परिवार बडोदाला आले. त्याच्या वडिलांचा व्यवसायही बंद झाला. त्यावेळी ते एका भाड्याच्या घरात राहायला लागले. 

     आता जगण्यासारखं उरलंय तरी काय?

19 वर्षांखालील संघात क्रिकेट खेळताना त्याच्याकडे पैशांची एवढी चणचण होती की तो मॅगी खाऊन दिवस काढायचा. मात्र, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून करारबद्ध झाल्यावर त्याचे आयुष्य बदलले. 2016मध्ये त्याने मुश्ताक अली ट्वेंटी20 स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. आतापर्यंत हार्दिकने भारतासाठी 54 एकदिवसीय सामन्यांत 957 धावा केल्या आहेत आणि 54 विकेट घेतल्या आहेत. 
 


​ ​

संबंधित बातम्या