हो! बुमरा विचित्र अन् भन्नाट आहे..!

वृत्तसंस्था
Friday, 31 August 2018

इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलरने तिसऱ्या सामन्यात त्याला दोन वेळा बाद केलेल्या जसप्रित बमुराच्या विचित्र अॅक्शनचे कौतुक केले आहे. ट्रेंट ब्रिजच्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद करत भारताला विजय मिळवून दिला. 

लंडन : इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलरने तिसऱ्या सामन्यात त्याला दोन वेळा बाद केलेल्या जसप्रित बमुराच्या विचित्र अॅक्शनचे कौतुक केले आहे. ट्रेंट ब्रिजच्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद करत भारताला विजय मिळवून दिला. 

भारताने या सामन्यात 203 धावांनी विजय मिळवला. या विजयात बुमराचा मोलाचा वाट होता. त्याचे कौतुक करताना बटलर म्हणाला, ''ट्रेंट ब्रिजमधील सामन्यात बुमराने पुनरागमन केले. त्याच्या आगळ्यावेगळ्या अॅक्शनमुळे त्याला खेळण्याची युक्ती सापडत नाही. त्याची चेंडू सोडण्याची पद्धत फार वेगळी आहे. तसेच भारतीय गोलंदाजीत विविधता असल्याने त्यांना सामोरे जाणे कठीण जाते. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारत 1-2ने पिछाडीवर आहे. चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सुद्धा भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखत इंग्लंडचा डाव 246 धावांमध्येच संपुष्टात आणला.


​ ​

संबंधित बातम्या